mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

Budget2020 : भांडवली नफा,वित्तीय तूट, बजेटमधील अवघड शब्दांचा सोपा अर्थ

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized

मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-

नरेंद्र मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील दुसरं बजेट आज (1 फेब्रुवारी) सादर केलं जाणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) या 11 वाजता बजेट सादर करतील (Budget 2020). बजेट सादर होण्यापूर्वी बजेट म्हणजे काय, त्यामध्ये नेमकं काय-काय असतं हे जाणूण घ्यायला हवं. बजेट सादर करताना अर्थमंत्र्यांकडून अनेक अवघड शब्दांचा वापर केला जातो. त्याचा नेमका अर्थ काय हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

‘बजेट अॅट ए ग्‍लान्स डॉक्‍युमेन्ट’मध्ये प्रत्येक प्रकारची माहिती दिली जाते. या कागदपत्रांमध्ये सरकारच्या उत्पन्न आणि खर्चाचा तपशील असतो. ‘अॅन्युअल फायनान्शिअल स्टेटमेन्ट’ म्हणजेच वार्षिक आर्थिक विवरणपत्र.

याचा देशातील प्रत्येक स्तरातील लोकांवर परिणाम होतो.

बजेटचे दोन भाग, त्यामध्ये कशाचा समावेश?

केंद्रीय अर्थसंकल्प म्हणजेच बजेटचे दोन भाग असतात. रेव्हेन्‍यू बजेट म्हणजेच महसूल अर्थसंकल्प आणि कॅपिटल बजेट म्हणजेच भांडवल अर्थसंकल्प. रेव्हेन्‍यू बजेटमध्ये 90 टक्के कराचा समावेश असतो. यात प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष कर, व्याज, लाभांश, सेवा संबंधित शुल्क यांचा समावेश असतो. कॅपिटल बजेटमध्ये सरकारी विभागांचे खर्च, कर्जावरील व्याज आणि अनुदान यांचा समावेश असतो.

भांडवली नफा आणि खर्च म्हणजे काय? यात फरक काय?

भांडवली नफा (Capital Receipts) आणि भांडवली खर्च (Capital Expenditure) हे दोन्ही वेगवेगळे आहेत. भांडवली नफ्यात सार्वजनिक कर्ज, आरबीआयचं कर्ज, परदेशी सरकारची मदत आणि कर्जवसुली असते. तर भांडवली खर्चात मालमत्ता खरेदीवर खर्च करणे किंवा गुंतवणूक आणि राज्य सरकारला दिलेलं कर्ज यांचा समावेश असतो.

आर्थिक नुकसान म्हणजे काय?

आर्थिक नुकसान (Fiscal Deficit) हे भांडवली नफा आणि भांडवली खर्च यातील तफावत आहे. आर्थिक नुकसानीला जीडीपीने भागल्यास त्याची टक्केवारी मिळते. याचा उल्लेख आर्थिक सर्वेक्षणात केला जातो.

वित्तीय तूट म्हणजे काय?

सरकारजवळ अपेक्षित असलेले कर्ज वगळता निधी (Budgeted Receipts) आणि खर्च (Budgeted Expenditure) यांच्यातील फरक म्हणजे वित्तीय तूट. यावरुन हा अंदाज लावला जातो की सरकारला कामकाज चालवण्यासाठी किती कर्जाची गरज आहे. वित्तीय तूट सामान्यत: महसूल कमी झाल्यामुळे किंवा भांडवली खर्चामध्ये वाढ झाल्याने होते. भांडवली खर्च हा दीर्घकालीन मुदतीच्या मालमत्तांवर होतो, जसे कारखाने, इमारतींचे बांधकाम आणि इतर विकासकामे. सामान्यत: वित्तीय तूटीची भरपाई ही आरबीआयकडून कर्ज घेऊन केली जाते.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: Desh-videshLatest News

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
खुशखबर:कॉन्स्टेबलच्या 900हून अधिक जागांसाठी भरती, असा करा अर्ज

खुशखबर:कॉन्स्टेबलच्या 900हून अधिक जागांसाठी भरती, असा करा अर्ज

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मोठी बातमी! उपसा सिंचन योजनेच्या कामाचे निघाले टेंडर; आ.आवताडे यांच्या प्रयत्नामुळे प्रत्यक्षात कामाला लवकरच होणार सुरुवात

जळालेला ट्रान्सफॉर्मर ३ दिवसांत द्या, अन्यथा गाठ माझ्याशी आहे; आमदार समाधान आवताडे यांचा महावितरणला ‘खणखणीत’ इशारा; शेतकऱ्यांच्या विजेसाठी आमदार मैदानात

May 7, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

धक्कादायक! बेपत्ता तरुणाचा जंगलात सापडला मृतदेह; रागाच्या भरात उचलले टोकाचे पाऊल; मंगळवेढ्यातील तरुणाची हृदयद्रावक आत्महत्या

May 7, 2026
मंगळवेढ्यात थरकाप! पहाटेच्या अंधारात ATM वर दरोडा; पोलिसांना पाहताच दरोडेखोरांचा ‘धूम’ स्टाईलने पोबारा

मंगळवेढ्यात थरकाप! पहाटेच्या अंधारात ATM वर दरोडा; पोलिसांना पाहताच दरोडेखोरांचा ‘धूम’ स्टाईलने पोबारा

May 7, 2026
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

मराठा समाजाच्या भावनांशी खेळू नका, अन्यथा गाठ आमच्याशी आहे; मनोज जरांगे-पाटील यांचा सरकारला थेट इशारा; ‘त्या’ विजयावरही संशय व्यक्त करत थेट निशाणा

May 6, 2026
वाळू आता ऑनलाईन मिळणार; ‘ना नफा, ना तोटा’ वर विक्री, नव्या धोरणाला मान्यता; यांच्या अध्यक्षतेखालील तांत्रिक समिती नेमली जाणार

मंगळवेढ्यात कायद्याचा धाक उरलाय की नाही? सीसीटीव्हीवर कापड झाकून वाळूची उघड दरोडेखोरी; कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा

May 6, 2026
सबजेल हाऊसफुल्ल पंढरपूरचे कैदी मंगळवेढ्यात वर्ग; कोरोना संसर्गाची कैद्यांना भीती

शेतकऱ्याला त्रास देणाऱ्या लाचखोर अधिकाऱ्याला न्यायालयाने चारली धूळ! ५ वर्षे सक्तमजुरी आणि जबर दंड; ​पंढरपूर न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल; लाच मागाल तर थेट तुरुंगात जाल

May 6, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा