मंगळवेढा टाईम्स न्युज।
२०२४ च्या संच मान्यता धोरण रद्द करणे आणि टीईटी परीक्षेमुळे वाढलेला संभ्रम यासाठी राज्यातील सर्व सरकारी आणि खासगी अनुदानित ८० हजार शाळांनी आज शुक्रवारी ५ डिसेंबर रोजी कडकडीत बंद पाळण्याचे आवाहन शिक्षक संघटनांनी केले आहे.
विरोधी व सत्ताधारी पक्षांतील शिक्षक आमदारांनी देखील या बंदला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे प्रशासन शासन आणि शिक्षक संघटना या आमने-सामने उभे ठाकल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

बंदमध्ये सामील होणाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन कपात करण्याचा आदेश माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी दिल्यानंतरही शिक्षकांनी आंदोलन करण्याचा निर्धार केला आहे.

शासन निश्चितपणे विचार करेल
आता वर्षातून दोनदा टीईटी परीक्षा घेण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. संचमान्यता प्रक्रियेवर शासनाने तात्पुरती स्थगितीही दिली आहे. या विषयावर शिक्षकांकडून विधायक सूचना आल्यास शासन निश्चितपणे त्यावर विचार करेल.- दादा भुसे, शिक्षण मंत्री.

संघटनांचे म्हणणे काय?
राज्यात ठिकठिकाणी शिक्षण विभागाच्या कार्यालयात शिक्षक निवेदन देणार आहेत, असे शिक्षक सेनेचे कार्याध्यक्ष जालिंदर सरोदे यांनी सांगितले.

तर संच मान्यता निकषांनुसार राज्यातील हजारो शाळांमध्ये केवळ एक किंवा दोनच शिक्षक नियुक्त होतील. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होईल, असा दावा प्राथमिक शिक्षक संघाचे संभाजीराव थोरात यांनी केला.

टीईटी परीक्षा अनिवार्य नको
संचमान्यतेच्या १५ मार्च २०२४ च्या शासन निर्णयात दुरुस्ती करणे आवश्यक आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या टीईटी सक्तीच्या निर्णयावर याचिका दाखल करावी. यासह विविध मागण्यांसाठी शिक्षकांचा पाठपुरावा सुरु आहे.

मात्र, या मागण्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळेच ५ डिसेंबरला आंदोलन केले जात आहे, असं तानाजी माने, अध्यक्ष माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ, सोलापूर यांनी सांगितले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज












