
टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूरात आज सकाळी नव्याने 5 कोरोना बाधित रुग्णांची भर पडली आहे. आज सकाळी नव्याने आलेल्या 5 रुग्णांमध्ये 4 पुरुष व 1 महिलांचा समावेश आहे. आज नव्याने वाढलेल्या 5 रुग्ण मुळे सोलापुरातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 570 झाली असल्याची माहिती देण्यात आली.
आज एकूण 77 रिपोर्ट प्राप्त झाले आहेत. त्यापैकी 5रिपोर्ट पॉझिटिव्ह आले असून 72 रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.
4 हजार 930 जण आत्तापर्यंत निगेटिव्ह आले असून 46 जणांचा आत्तापर्यंत मृत्यू झाला आहे. कोरोना मुक्त झालेल्या व्यक्तींची संख्या 249 असल्याची माहितीही जिल्हाधिकारी शंभरकर यांनी दिली.
सोलापूर शहर व जिल्ह्यातील 5 हजार 500 जणांची आतापर्यंत कोरोना चाचणी करण्यात आली असल्याची माहितीही दिली. सोलापूर शहर व जिल्ह्यातील कोरोना आटोक्यात आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.
——————
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज












