टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा तालुक्यातील २७ ग्रामपंचायतिच्या निवडणुकीसाठी काल तिसऱ्या दिवशी सरपंचपदासाठी ५२ तर सदस्यपदासाठी २३८ इतके अर्ज दाखल झाले असून निवडणूक आयोगाने आर्ज भरण्याची वेळ वाढवून दिल्याने इच्छुक उमेदवारांना त्याचा फायदा झाला आहे.
गेली दोन दिवस झाले सलग निवडणूक आयोगाचे संकेतस्थळ बंद असल्याने अर्ज भरण्यासाठी आलेल्या इच्छुक उमेदवारांच्या आकांक्षेवर पाणी फिरले होते परंतु, काल तिसऱ्या दिवशी विक्रमी अर्ज दाखल झाले आहेत.
मंगळवेढा तहसील कार्यालयात दि.१६ पासून उमेदवारी भरण्यास सुरवात झाली असून अर्ज स्वीकारण्यासाठी २७ गावासाठी स्वतंत्र टेबल अधिकारी यांची व्यवस्था करण्यात आली आहे.
परंतु, पहिल्या व दुसऱ्या दिवशी निवडणूक आयोगाचे अर्ज भरण्याचे सर्व डाऊन असल्यामुळे इच्छुकांना अर्ज भरता आले नाहीत. परंतु काल तिसऱ्या दिवशी सर्व्हर चालू असल्याने उमेदवारांना अर्ज भरता आला.
सदस्य, सरपंच पदासाठी पुढीलप्रमाणे अर्ज दाखल झाले आहेत.
आंधळगाव- सदस्य ११ सरपंच ४, लक्ष्मी दहिवडी सदस्य १२, ब्रम्हपुरी सदस्य १, हिवरगाव सदस्य ६ सरपंच १, भाळवणी सदस्य ५ सरपंच १, मानेवाडी सदस्य ३३, सरपंच ५, शिरसी सदस्य ८ सरपंच २, खडकी सदस्य ५ सरपंच २, बठाण सदस्य १५ सरपंच ३, रेवेवाडी सदस्य २१ सरपंच ३,
निंबोणी सदस्य ५ सरपंच ४, चिक्कलगी सदस्य १८ सरपंच २, पडोळकरवाडी सदस्य २४ सरपंच ३, शेलेवाडी सदस्य १४ सरपंच २, डिकसळ सरपंच १, जालीहाळ सदस्य ४ सरपंच ३,
खुपसंगी सदस्य ७ सरपंच १, रड्डे सदस्य ३ सरपंच ६, महमदाबाद हु सदस्य २७ सरपंच ५, देगाव सदस्य ४, उचेठाण सदस्य ४ सरपंच ३, जुनोनी सदस्य १ सरपंच १, अकोला सदस्य ७, लमाणतांडा सदस्य ३ इतके अर्ज दाखल झाले आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज