मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । कोरोना वाढत्या प्रादुर्भावामुळे हातावर पोट असलेल्या सर्वसामान्य लोकांना मोठा फटका बसला आहे. लॉकडाउमुळे रोजगार बंद झाला. त्यामुळे लोकांच्या पोटापाण्यावर गदा आली आहे. अशातच केंद्र शासनाने सर्वसामान्य लोकांना मदतीची हात दिला आहे.
आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती लक्षात घेता केंद्र शासनामार्फत देशातील प्रधानमंत्री जनधन खातेधारक असलेल्या महिलांच्या बचत खात्यात 500 रुपये रक्कम जमा करण्यात आली आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत देशातील प्रधानमंत्री जनधन खातेधारक असलेल्या महिलांच्या खात्यात एप्रिल महिन्याची आर्थिक रक्कम जमा करण्यात आली आहे. तसेच प्रधानमंत्री किसान सन्मान निधीतंर्गत 2 हजार रुपये ही पहिल्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे.
खातेधारक महिलेच्या जनधन खाते क्रमांकाच्या शेवटच्या अंकाप्रमाणे ही रक्कम काढण्यासाठी ठराविक तारखा ठरवून दिल्या आहेत. त्यानुसार जर खाते क्रमांकातील शेवटचा अंक 0 ते 1 (3 एप्रिल), 2 ते 3 (4 एप्रिल), 4 ते 5 (7 एप्रिल), 6 ते 7 (8 एप्रिल), 8 ते 9 (9 एप्रिल) अशा या तारखा आहेत. या बचत खात्यातून त्या ठराविक दिवशी किंवा 9 एप्रिलनंतर केव्हाही हे पैसे काढता येणार आहे.
दरम्यान, केंद्राच्या या निर्णायाचं सर्व स्तरातीृून कौतू केलं जात आहे. केंद्राने पैसे देताना काही तारखा ठरवून दिल्या आहेत. त्यामचा हेतू असा की गर्दी टाळण्यासाठी ही रक्कम काढण्यासाठी तारखा ठरवून देण्यात आल्या आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज