mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मंगळवेढा तालुक्यातील रस्ते आता चकाचक होणार; अधिवेशनाच्या पाहिल्यास दिवशी 50 कोटींचा निधी मंजूर

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
August 19, 2022
in मंगळवेढा
विकासात्मक आमदार! मंगळवेढा व पंढरपूर नगरपरिषदेस ५ कोटी मंजूर, समाधान आवताडेंच्या पाठपुराव्याला यश; संपूर्ण कामांची यादी पाहा…

टीम मंगळवेढा टाईम्स। 

महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर नवीन सरकारच्या पहिल्याच अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आमदार समाधान आवताडे यांनी मागणी केलेल्या मंगळवेढा तालुक्यातील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी 50 कोटीचा निधी मंजूर झाला असून राज्यात मविआ सरकार कोसळल्यानंतर पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाला चांगले दिवस आले आहेत.

गेल्या महिन्याभरात जवळपास ७५ कोटी रुपयांची विकास कामांना मंजुरी मिळाली असल्याची माहिती आमदार समाधान आवताडे यांनी दिली.

आमदार समाधान आवताडे यांनी पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा मतदारसंघ कार्यक्षेत्रातील रस्ते अतिशय खराब झालेले असून रस्त्याच्या पृष्ठभागामध्ये मोठे खड्डे पडले असल्याने वाहतुकीची मोठी गैरसोय होत असल्याच्या अनुषंगाने रस्ते रुंदीकरण व सुधारणा करण्यासाठी पुरवणी अर्थसंकल्पामध्ये निधीची तरतूद करावी अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती.

आमदार समाधान आवताडे यांच्या या मागणीला मोठे यश मिळाले सदर रस्त्यांसाठी एकूण ५० कोटी ५ लाख इतका निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात मंगळवेढा तालुक्यातील रस्ते चकाचक होणार आहेत.

नवीन सरकार स्थापनेनंतर नव्या विकास विमुख शासनाने पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाला भरघोस निधी पुरवणी मागण्याच्या मार्फत दिला आहे.

यातील मंगळवेढा तालुक्यात मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाला आहे. याबद्दल आमदार साहेबानी समाधान व्यक्त केले.

परंतु पंढरपूर तालुक्यातील रस्त्यांच्या दर्जोन्नती नसल्यामुळे एक ही काम पंढरपूर तालुक्यातील घेता न आल्यामुळे त्यांनी खंत व्यक्त केली.

50-54 च्या शीर्षकाखाली जर रस्त्याची दर्जोन्नती झाली नसेल तर हे काम सदर शीर्षकाखाली घेता येत नाही या करताच रस्त्यांची दर्जोन्नती होणे आवश्यक असते,

पण मागील अनेक वर्षांपासून सदरचा दर्जोन्नतीचा प्रस्ताव प्रलंबित आहे.याकरिता मी स्वतः उपमुख्यमंत्री यांना सदर रस्त्याची दरजोन्नती त्वरित होणेकरता विनंती केली आहे.

पंढरपूर आणि मंगळवेढा शहर आणि ग्रामीण भागातील नागरी सुविधांसाठी, ग्रामीण भागातील पाणंद रस्त्यांसाठी, पाणी पुरवठा योजनेच्या माध्यमातून कोट्यवधींचा निधी सत्तांतरानंतर आमदार समाधान आवताडे यांनी मतदारसंघात आणला आहे.

आ समाधान आवताडे यांनी निधी तरतूद मागणी केलेल्या रस्त्यांची यादी पुढीलप्रमाणे –

पाटखळ – नंदेश्वर – भोसे – हुन्नूर ते राज्य हद्द रस्त्यांची सुधारणा करणे ३ कोटी ५० लाख, मांजरी – लक्ष्मी दहिवडी – आंधळगाव -पाटखळ -भाळवणी – तळसंगी रस्ता सुधारणा करणे ७ कोटी ५० लाख, महमदाबाद -लोणार – पडोळकरवाडी जिल्हा हद्द रस्ता सुधारणा करणे ३ कोटी ८० लाख,

पाटखळ – नंदेश्वर -भोसे – रेवेवाडी रस्ता सुधारणा करणे ७ कोटी ५० लाख, मंगळवेढा -डोंगरगाव – शिरनांदगी – हाजापूर रस्ता रस्ता सुधारणा करणे ५ कोटी, धर्मगाव -ढवळस – मल्लेवाडी – घरनिकी – मारापुर गुंजेगाव -लक्ष्मीदहिवडी -मेडशिंगी ते जवळा रस्ता सुधारणा करणे ३ कोटी ५० लाख,

मंगळवेढा -खोमनाळ – भाळवणी – निंबोणी – सलगर बु रस्ता सुधारणा करणे ३ कोटी, मंद्रूप – निंबर्गी – भंडारकवठे – कर्जाळ – हुलजंती – पौट – मरीआई चौक निंबोणी – नंदेश्वर -गोणेवाडी – लेंडवेचिंचाळे रस्ता सुधारणा करणे ९ कोटी,

दिघंची जिल्हा सरहद्द खवासपुर – लवटेवाडी – सोनलवाडी – वाणीचिंचाळे
– भोसे घेरडी -हुन्नूर – मारोळी – सलगर बु  ७ कोटी २५ लाख असा निधी मंजूर झाला आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: आमदार समाधान आवताडे

संबंधित बातम्या

शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिलासा: पंचनामे पूर्ण; केंद्रीय पथक पाहणीसाठी दाखल; आज मंगळवेढ्यात; मदत कधी आणि किती मिळणार?

October 10, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

पाणीटंचाई आणि चाऱ्याचे संकट! सर्व ८ मंडलांतील शेतकऱ्यांना मिळणार मदत; मदतीपासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही; आ.आवताडे यांची मोठी ग्वाही

October 7, 2026
सोलापूरचे नाव पुन्हा राज्यात उज्ज्वल! प्रा.डॉ. सागर पाटील यांना प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार; शिक्षण क्षेत्रातील बहुमोल योगदानाची दखल

सोलापूरचे नाव पुन्हा राज्यात उज्ज्वल! प्रा.डॉ. सागर पाटील यांना प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार; शिक्षण क्षेत्रातील बहुमोल योगदानाची दखल

October 6, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

प्राणघातक हल्ला! मंगळवेढ्यात शेतजमिनीच्या वादातून महिलेला दगडाने बेदम मारहाण; एकाच कुटुंबातील चौघांवर गुन्हा दाखल

October 6, 2026
दिपावलीचा दुसरा हप्ता कारखान्यांनी देऊन शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी; ऊस उत्पादक शेतकरी बालाजी गरड यांचे भावनिक आवाहन

मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी उपसरपंच बालाजी गरड यांची आक्रमक भूमिका; सर्व शेतकऱ्यांना विनाविलंब आर्थिक मदत व दुष्काळ निधी देण्याची मागणी

October 6, 2026
मोठी बातमी! सिद्धेश्वर रणे यांच्याकडे मंगळवेढा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची धुरा; खा.धैर्यशील मोहिते पाटील यांनी सोपवली जबाबदारी

मोठी बातमी! सिद्धेश्वर रणे यांच्याकडे मंगळवेढा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची धुरा; खा.धैर्यशील मोहिते पाटील यांनी सोपवली जबाबदारी

October 5, 2026
मागेल त्याला टँकर! शेतातील नुकसानीचे पंचनामे तात्काळ करा; एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहता कामा नये: आमदार समाधान आवताडे यांच्या अधिकाऱ्यांना कडक सूचना

मागेल त्याला टँकर! शेतातील नुकसानीचे पंचनामे तात्काळ करा; एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहता कामा नये: आमदार समाधान आवताडे यांच्या अधिकाऱ्यांना कडक सूचना

October 4, 2026
मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे! मंगळवेढ्यात घोषणाबाजीसह शांततेच्या मार्गाने शहर व तालुका कडकडीत बंद; उपोषणाला शहर अन् तालुक्यातून प्रचंड पाठिंबा

खोट्या अट्रोसिटीच्या विरोधात मंगळवेढा शहर कडकडीत राहिले बंद; आमदार समाधान आवताडे यांच्या आश्वासनानंतर आंदोलन घेतले मागे

October 4, 2026
वाळू माफियांची मुजोरी तहसिलदारांच्या अंगावर गाडी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न

मंगळवेढ्यात संतापाची लाट! आजपासून तालुका बेमुदत बंद; खोटे ॲट्रॉसिटी गुन्हे मागे घेण्यासह १२ आरोपींच्या तात्काळ अटकेची जोरदार मागणी; संपूर्ण जिल्ह्याचे लागले लक्ष

October 3, 2026
Next Post
उजनी पाणीप्रश्न! म्हणे दत्तात्रय भरणे मामांच्या खाद्यांवर बंदूक; पालकमंत्री बदलून प्रश्न सुटणार का?

उजनीचे पाणी बारामतीला वळवणे कायमचे होणार बंद; पाच भ्रष्ट नेत्यांच्या फायली तयार असल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट

ताज्या बातम्या

विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षांसाठी वीजपुरवठा सुरळीत ठेवा

दुहेरी संकट! दुष्काळात ‘करंट’चा झटका; अंगाची लाही अन् विजेचा खोडसाळपणा; भीषण दुष्काळात सोलापूर जिल्ह्यात भारनियमनाचा घाव

October 10, 2026
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिलासा: पंचनामे पूर्ण; केंद्रीय पथक पाहणीसाठी दाखल; आज मंगळवेढ्यात; मदत कधी आणि किती मिळणार?

October 10, 2026
मंगळवेढा तालुक्यात एकाच दिवशी कोरोनाने घेतला दोघांचा बळी; आज 10 जणांना लागण

मृतांच्या टाळूवरचं लोणी! कोरोनातील २२ मृतांवर कागदोपत्री ‘उपचार’ दाखवून लाटले २ कोटी; मृत्यूनंतर ६ वर्षांनी ‘उपचार’?

October 9, 2026
सोन्याच्या पावलांनी गौराई आली…; गौरी पूजनासाठी लागणारे साहित्य कोणते? ‘अशी’ करा पूजेची मांडणी

नवरात्र नऊ नाही, यंदा तब्बल १० दिवसांचे! सप्तमी तिथी वाढली; असा आहे घटस्थापनेचा मुहूर्त

October 10, 2026
पालकमंत्रिपदी नियुक्त झाल्यानंतर पहिल्यांदाच जयकुमार गोरे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

मागणी करा, चारा डेपो लगेच सुरू होणार; सोलापूरच्या शेतकऱ्यांना पालकमंत्र्यांचा मोठा दिलासा; रब्बी पेरणीपूर्वी ‘हे’ तपासण्याचे आवाहन

October 8, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

पाणीटंचाई आणि चाऱ्याचे संकट! सर्व ८ मंडलांतील शेतकऱ्यांना मिळणार मदत; मदतीपासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही; आ.आवताडे यांची मोठी ग्वाही

October 7, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा