mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मंगळवेढा उपसा सिंचन योजनेतून ४५ हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार; पाणी परिषदेच्या माध्यमातून शासनाकडे पाठपुरावा करणार; प्रा.शिवाजीराव काळुंगे यांचे आश्वासन

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
June 27, 2023
in मंगळवेढा
मंगळवेढा उपसा सिंचन योजनेतून ४५ हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार; पाणी परिषदेच्या माध्यमातून शासनाकडे पाठपुरावा करणार; प्रा.शिवाजीराव काळुंगे यांचे आश्वासन

मंगळवेढा टाइम्स न्यूज नेटवर्क ।

दुष्काळी भागाला पाणी देण्याच्या अनेक घोषणा सरकारकडून होतात. पण, प्रत्यक्षात खर्चाची तरतूद होत नाही. पाण्यासाठी कर्नाटकात जाण्याची भाषा करण्यापेक्षा सत्ताधाऱ्यांच्या छाताडावर नायायची तयारी ठेवावी, असे आवाहन पाणी चळवळीचे निमंत्रक वैभव नाईकवाडी यांनी केले.

राज्यातील १३ दुष्काळी तालुक्यांची ३१ वी पाणी परिषद मंगळवेढ्यात झाली. त्या पाणी परिषदेत नाईकवाडी बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा.शिवाजीराव काळुंगे हे होते. पाणी परिषदेचे निमंत्रक नाईकवाडी म्हणाले की, पाणी परिषदेचा लढा सुरू झाल्यानंतर अनेक सरकारे आली. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतर पाणीप्रश्न सुटला नाही. या परिषदेने जनतेला, सरकारला जागे केल्यामुळे अनेक योजना मार्गी लागल्या. काही योजना अजून प्रलंबित आहेत.

पाणी चळवळ अधिक सक्षम झाली पाहिजे. राज्य व केंद्र सरकारच्या अधिकारात ज्या योजना आहेत, त्या पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा करू. पण, घरात बसून प्रश्न उपस्थित केला, तर पाणी येणार नाही, त्यासाठी चळवळीत उतरावे लागेल, असेही नाईकवाडी यांनी स्पष्ट केले

प्रा. बाबूराव गुरव म्हणाले की, राज्यातील सत्ताधाऱ्यांनी आपापसातील भांडणे व आरोप-प्रत्यारोप थांबवून, रखडलेल्या पाणीप्रश्नाला निधी द्यावा. पाण्यासाठी वंचित असलेल्या शेतकऱ्यांनी कर्नाटकात जाण्याच्या इशारा देण्याऐवजी सरकारला वाकवण्याची तयारी ठेवावी.

मुंबईत ५५ व्या मजल्यावर पोहण्यासाठी पाणी चढते, शेतीला देताना मात्र भाग चढावर आहे, असे सांगून टाळले जाते. मंगळवेढा, बार्शी, लातूर, उस्मानाबाद यांचाही कृष्णा खोऱ्यातील पाण्यावर हक्क आहे.

महाराष्ट्राने पाणी अडविले नसल्याने कर्नाटक सरकारला त्याच्या धरणाची उंची वाढवावी लागली. म्हैसाळच्या सहाव्या टप्प्यातील कामासाठी दोन हजार कोटींच्या कामाचे टेंडर काढले. वर्क आर्डर झाली; पण कामास सुरूवात नाही.

अॅड बाबासाहेब देशमुख म्हणाले की, स्वातंत्र्यानंतर या देशातील शेतकऱ्यालाच पाण्यासाठी रस्त्यावर उतरावे लागते. सांगोल्याच्या पाण्यासाठी (स्व.) आबासाहेबांचे योगदान विरोधी पक्षालादेखील मान्य आहे. इथल्या पाण्याचे श्रेय इतरांना घेण्याचा अधिकार नाही.

अध्यक्षपदावरून शिवाजीराव काळुंगे म्हणाले की, सरकार कोणाचेही असो पाणीप्रश्न मार्गी लागलेला नाही. या परिषदेत मांडलेले ठराव आपणास शासनदरबारी नेऊन पाठपुरावा करावा लागेल. मंगळवेढा तालुक्यावर मोठा अन्याय सुरू आहे. म्हैसाळचे पाणी लगेच बंद केल्याने फक्त जनावरांची तहान भागली; पण शेतीच्या पाण्याचा प्रश्न तसाच आहे.

मंगळवेढा उपसा सिंचन योजनेतून ४५ हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. (स्व.) भारत भालके यांनी पाठपुरावा केलेल्या त्या योजनेसाठी पूर्ण ताकदीने परिषदेच्या माध्यमातून शासनाकडे प्रयत्न करणे गरजेचे आहे.

सीताराम कारखान्याच्या राजलक्ष्मी गायकवाड म्हणाल्या की, स्वातंत्र्यासाठी केलेल्या संघर्षाच्या बरोबरीने आजही पाण्यासाठी संघर्ष करावा लागतोय, हे दुर्दैवआहे. पाण्याच्या चळवळीत (स्व.) नागनाथ नाईकवाडी, (स्व.) गणपतराव देशमुख यांच्याबरोबर शिवाजीराव काळुंगे यांचे मंगळवेढ्याचे योगदान कौतुकास्पद ठरले.

या वेळी अॅड भारत पवार, दामोदर देशमुख, बी. बी. जाधव, भाई चंद्रकांत देशमुख यांची भाषणे झाली. या परिषदेत १२ ठराव मंजूर करण्यात आले. सुत्रसंचालन इंद्रजीत घुले यांनी, तर अॅड राहूल घुले यांनी आभार मानले.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: पाणी परिषदशिवाजीराव काळुगे

संबंधित बातम्या

राजनंदिनी महिला ग्रामीण बँकेचा आज मंगळवेढ्यात भव्य उद्घाटन सोहळा; निराधार महिलांना इतरांपेक्षा एक टक्का कमी व्याजदर

मंगळवेढ्यात सुवर्णसंधी! ‘राजनंदिनी महिला ग्रामीण पतसंस्थे’त विविध पदांसाठी थेट भरती; रविवारी मुलाखती

May 29, 2026
राजकीय खळबळ! मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट अन् मंगळवेढ्यात चर्चांना उधाण; बबनराव आवताडे कमळ हाती घेणार? काय घडलं ‘त्या’ भेटीत?

राजकीय खळबळ! मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट अन् मंगळवेढ्यात चर्चांना उधाण; बबनराव आवताडे कमळ हाती घेणार? काय घडलं ‘त्या’ भेटीत?

May 28, 2026
पोलिसांनी रोखला अल्पवयीन नवरदेवाचा विवाह; सोलापूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना

पहिले लग्न आणि मुलगीही लपवली! नवरी नटून पोहोचली थेट जेलमध्ये; ३ मध्यस्थांवर गुन्हा दाखल; मंगळवेढ्यात लग्न फसवणुकीचा मोठा भांडाफोड

May 27, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

धक्कादायक! मंगळवेढ्यात हॉटेलच्या स्वयंपाकघरातच मालकिणीने उचलले टोकाचे पाऊल; घटनेने परिसरात खळबळ

May 27, 2026
माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या हस्ते देवेंद्र फडणवीसांचा सत्कार; मालकांनी ठरल्याप्रमाणे केलं… आता संधी मिळणार का? परिचारक समर्थकांचा सवाल

सोलापूर विधानपरिषद निवडणूक: उमेदवारीबाबत सस्पेन्स कायम; कार्यकर्त्यांची धाकधूक वाढली; मुंबईत लॉबिंग सुरू; परीचारकांचे नाव आघाडीवर पण…

May 26, 2026
मंगळवेढ्यात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची महत्त्वाची बैठक; पक्षबांधणीवर भर, तालुकाध्यक्ष व शहराध्यक्ष पदांच्या ‘या’ नावांची जोरदार चर्चा

मंगळवेढ्यात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची महत्त्वाची बैठक; पक्षबांधणीवर भर, तालुकाध्यक्ष व शहराध्यक्ष पदांच्या ‘या’ नावांची जोरदार चर्चा

May 26, 2026
एका बाजूला यांची मोदींची गॅरंटी आणि दुसऱ्या बाजूला दर दिवसाला शेतकरी आत्महत्या करतोय; ही स्थिती किती दिवस चालू द्यायची; शरद पवारांनी साधला निशाणा

राजकीय घडामोडींना वेग! मंगळवेढ्यात राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) गटाची आज मोठी बैठक; ३७ सेलच्या निवडींबाबत होणार खलबतं; आजी-माजींसह इच्छुकांना बोलावले

May 24, 2026

मंगळवेढ्यात खळबळ! शासकीय कामात अडथळा; शेत रस्त्याच्या कामावरून मंडळ अधिकारी व तलाठ्याला दमदाटी, गुन्हा दाखल

May 24, 2026
🛑मंगळवेढ्यात पिस्तुल घेऊन आले आणि थेट पोलिसांच्याच जाळ्यात अडकले; कोठून आणले पिस्तुल? कोणाचा गेम करणार होते? मंगळवेढ्यातील ‘त्या’ दोघांच्या अटकेने मोठी खळबळ

🛑मंगळवेढ्यात पिस्तुल घेऊन आले आणि थेट पोलिसांच्याच जाळ्यात अडकले; कोठून आणले पिस्तुल? कोणाचा गेम करणार होते? मंगळवेढ्यातील ‘त्या’ दोघांच्या अटकेने मोठी खळबळ

May 24, 2026
Next Post
तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव आणि कोमल ढोबळे-साळुंखे यांच्या भेटीत नेमकं काय घडलं? भेटीनंतर कोमलताई म्हणाल्या…

तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव आणि कोमल ढोबळे-साळुंखे यांच्या भेटीत नेमकं काय घडलं? भेटीनंतर कोमलताई म्हणाल्या...

ताज्या बातम्या

प्रियकराच्या सांगण्यावरूनच जन्मदात्या आईने 9 महिन्याच्या बाळाचा गळा घोटला

धडाधड गोळीबार, सहा जणांचा मर्डर! मंगळवेढा तालुक्याच्या शेजारील राज्यात साऊथ सिनेमाला लाजवेल असं मन विचलित करणारं हत्याकांड; रस्ता रक्ताने माखला, हत्येचं कारण समोर

May 30, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

तब्बल पावणे सतरा लाखांचा गैरव्यवहार; ग्रामपंचायतीच्या सरपंचांचे थेट निलंबन, विभागीय आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय

May 30, 2026
राजनंदिनी महिला ग्रामीण बँकेचा आज मंगळवेढ्यात भव्य उद्घाटन सोहळा; निराधार महिलांना इतरांपेक्षा एक टक्का कमी व्याजदर

मंगळवेढ्यात सुवर्णसंधी! ‘राजनंदिनी महिला ग्रामीण पतसंस्थे’त विविध पदांसाठी थेट भरती; रविवारी मुलाखती

May 29, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

मेहनत विद्यार्थ्यांची, मलिदा चोरांचा! NEET पेपरफुटीच्या टेन्शनमुळे १९ वर्षांच्या तरुणाची आत्महत्या; डॉक्टर होण्याचे स्वप्न भंगले

May 29, 2026
धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

स्कॉर्पिओमध्ये माजी सरपंच, झेडपी सदस्य पत्नी, आई आणि भाचीसह चार जणांना जिवंत जाळलं; पहिल्यांदा अपघाताचा बनाव, पण.. थरकाप उडवणारी घटना समोर

May 29, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

May 29, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा