mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

संचारबंदीत मास्क न लावता मोटर सायकलवरून फिरणार्‍या 22 लोकांवर गुन्हे दाखल

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
संचारबंदीत मास्क न लावता मोटर सायकलवरून फिरणार्‍या 22 लोकांवर गुन्हे दाखल



मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । कोरोना व्हायरसला अटकाव करण्यासाठी राज्य शासनाने संचारबंदी लागू केली आहे. या आदेशाचा भंग करून चार चाकी व टु व्हिलरवरून फिरणारे तसेच विनाकारण पायी चालत फिरल्या प्रकरणी 22 लोकांवर मंगळवेढा पोलिसांनी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदयांतर्गत शासनाच्या आदेशाचा भंग केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

पहिल्या घटनेत यातील आरोपी संजय सलवदे (रा डोणज),योगेश जाधव,अभिषेक पाटील,अमर गवळी (रा.बोराळे),सचिन कपले(रा.सिध्दापूर) आदी आरोपी दि. 30 रोजी 7.30 वा. बोराळे येथील बसवेश्‍वर मंदिराच्या कट्टयावर विनाकारण एकत्रीत जमून स्वतःचे व इतरांचे जीवितास संसर्ग पसरेल अशा स्थितीत मिळून आले याची फिर्याद पोलिस हवालदार चन्नप्पा म्हेत्रे यांनी दिल्यानंतर वरील पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसर्‍या घटनेत दि. 30 रोजी 5.30 वा. मंगळवेढा-पंढरपूर रोडवरील मार्केट यार्डासमोर रस्त्यावर आरोपी शरीफ कलाल,अब्दुल वस्ताद रा.मंगळवेढा हे दोघे स्वतःचे तोंडास मास्क न लावता व स्वतःचे व इतरांच्या जिवीतास धोका उत्पन्न होईल अशा स्थितीत मोटर सायकलवर विनाकारण फिरत असताना मिळून आल्याची फिर्याद पोलिस नाईक विकास क्षीरसागर यांनी दिली आहे.

तिसर्‍या घटनेत आरोपी विठ्ठल गारगोंडे,दामाजी माळी,सुहास मेटकरी,मारुती कवडे(रा.मंगळवेढा) आदी दि.30 रोजी शहरात मुंबई पोलिस अधिनियम 144 प्रमाणे 5 पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास मनाई असताना वरील चार  आरोपींनी एकत्र जमून संसर्ग पसरेल अशा स्थितीत मिळून आल्याची फिर्याद पोलिस शिपाई अनिल दाते यांनी दिली आहे.

चौथ्या घटनेत आरोपी संंग्राम गायकवाड (रा.ढवळस) याने एम एच 13 के एच 6189 या मोटर सायकलवरून स्वतःचे व इतरांचे जीवीतास संसर्ग पसरेल अशा स्थितीत चोखामेळा चौकात मिळून आला असल्याची फिर्याद पोलिसांनी दिली आहे.

पाचव्या घटनेत आरोपी दामोदर ढेकळे,चंद्रकांत ढेकळे (रा.देगांव) हे दोघे एम एच 13 डी.एफ 9193 वरून स्वतःचे तोंडास मास्क न लावता मोटर सायकलवर फिरत असताना पंढरपूर रस्त्यावरील महादेव मंदिरासमोर मिळून आला असल्याची फिर्याद पोलिस नाईक समाधान पाटील यांनी दिली.

सहाव्या घटनेत आरोपी अनिकेत गायकवाड , प्रथमेश बोडके (रा.मंगळवेढा) हे दोघे एम एच 13 सी.बी. 0985 वरून तोंडास मास्क न लावता मोटर सायकलवर दामाजी चौकात मिळून आले.

सातव्या घटनेत नंदू चव्हाण,दिनानाथ चव्हाण(रा.मंगळवेढा) हे एम एच 13 सी एच 6281 वरून तोंडास मास्क न लावता फिरत असताना मार्केट यार्डासमोर मिळून आल्याची फिर्याद पोलिस शिपाई अजित मिसाळ यांनी दिली आहे.

आठव्या घटनेत आरोपी सुखसेन हुवहा (रा.मध्य प्रदेश),अमर धनगर (रा.उत्तर प्रदेश) हे दोघे एम एच 13 सी ए 6821 या मोटर सायकलवरून तोंडास मास्क न लावता संजीवनी हॉस्पीटलजवळून जाताना मिळून आल्याची फिर्याद पोलिस शिपाई नागनाथ डबरे यांनी दिली.

नवव्या घटनेत आरोपी रमेश चव्हाण (रा.विजापूर),अर्जून जाधव(रा.इंडी) हे दोघे के ए 28 एक्स,4504 वरून मास्क न लावता मिळून आल्याची फिर्याद पोलिसांनी दिली आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: CrimeMangalWedha

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
कोरोनाचा राजकीय इफेक्ट ; सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी डॉ.जितेंद्र आव्हाड यांची नियुक्ती

कोरोनाचा राजकीय इफेक्ट ; सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी डॉ.जितेंद्र आव्हाड यांची नियुक्ती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Transfer! मंगळवेढा पोलिस ठाण्याकडील ‘या’ पोलिस कर्मचार्‍यांच्या अन्यत्र बदल्या; नवीन ‘हे’ आले

महिलांनो दागिने सांभाळा! वटपौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर मंगळवेढा पोलीस हायअलर्टवर; संशयास्पद व्यक्ती दिसल्यास थेट ‘या’ नंबरवर कॉल करा

June 29, 2026
मंगळवेढ्यातील श्री सायकल कंपनीमध्ये बॅटरी ऑपरेटर कार वरती 20 टक्के पर्यंत डिस्काउंट; नागरिकांना कार खरेदीसाठी मोठी संधी

मंगळवेढेकरांसाठी खुशखबर! ‘श्री सायकल कंपनी’मध्ये लहान मुलांच्या बॅटरी कार आणि जीपवर धमाकेदार ऑफर; सोबतीला नोकरीची सुवर्णसंधी

June 29, 2026
मंगळवेढा ब्रेकिंग! पोलीस पाटलाचा अपघाती मृत्यू

हृदयद्रावक! सात महिन्यांचं बाळ पोटातच गेलं, पती-पत्नीचाही जागीच अंत; एकाच चितेवर पेटली नवदांपत्याची चिता; सांगोल्यातील ‘त्या’ अपघाताने डोळ्यात येईल पाणी…

June 29, 2026
सोलापूर ब्रेकिंग! ‘या’ तालुक्यातील ग्रामपंचायती बिनविरोध झाल्यास अख्ख्या गावाला मोफत रक्तपुरवठा

हे यमराजा, उद्या आमच्या बायका येतील पण…;  वटपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला नक्की काय घडलं? पुरुषांनी फोडला हंबरडा; ज्याची चर्चा आता संपूर्ण राज्यात आहे?

June 29, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

खळबळजनक! ​फक्त एक प्रश्न अन्‌ रक्ताचा सडा…, मेव्हण्याने भाऊजीवर केला प्राणघातक हल्ला; मंगळवेढ्यामध्ये नेमकं काय घडलं?

June 29, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

तिकडे NEET चा बाजार, इकडे TET चा तमाशा; गरिबांच्या पोरांनी फक्त फी भरायची का? प्रहारच्या राकेश पाटीलांचा संतप्त सवाल; टीईटी’ परीक्षा कायमस्वरूपी रद्द करण्याची मागणी

June 28, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा