मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । सोलापुरातील पाच्छा पेठेतील 56 वर्षीय किराणा दुकानदाराचा मृत्यू झाल्यानंतर तो कोरोना बाधित असल्याचे समोर आले होते. या दुकानदाराच्या संपर्कात 148 जण आले असून या सर्वांचे नमुने कोरोना चाचणीसाठी घेण्यात आले आहेत. त्यापैकी 124 जन निगेटिव्ह तर एक महिला पॉझिटिव्ह आढळली आहे. त्या महिलेच्या संपर्कात 22 जण आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.
मयत किराणा दुकानदाराच्या संपर्कात आलेल्या 148 जणांपैकी 125 जणांचे कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. उर्वरित 23 जणांचे रिपोर्ट अद्याप प्राप्त झालेले नाहीत. कोरोना बाधित महिलेच्या संपर्कात आलेल्या 22 जणांचे नमुने कोरोना चाचणीसाठी घेण्यात आले आहेत.
या 22 जणांचाही अहवाल अद्याप प्राप्त झाला नसल्याची माहिती जिल्हाधिकारी शंभरकर यांनी दिली आहे. मयत किराणा दुकानदाराच्या संपर्कात आलेल्या व अद्याप रिपोर्ट आलेल्या 23, महिलेच्या संपर्कात आलेल्या 22 अशा एकूण 45 जणांचे कोरोनाचा चाचणी अहवाल आज (बुधवारी) रात्रीपर्यंत प्राप्त होतील अशी अपेक्षा आहे.
———-
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज