मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क।
श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी आज ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
पंढरपूर विधानसभा मतदारसंघाचे ते २०२४ मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार असण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची चर्चा रंगली होती.
विठ्ठल साखर कारखान्याच्या बायो सीएनजी प्रकल्पाचे उद्घाटन ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते झाले. त्या कार्यक्रमात अभिजित पाटील यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.
खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार रोहित पवार, बबनराव शिंदे, संदीप क्षीरसागर, संजय पाटील, कैलास पाटील, रवींद्र धंगेकर, माजी आमदार राजन पाटील, दीपक साळुंखे,
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे, महेश कोठे यांच्यासह पक्षाचे मान्यवर उपस्थित हेाते. अभिजित पाटील यांच्या प्रवेशामुळे पंढरपुरात राष्ट्रवादी आणखी बळकट झाली आहे.
त्यामुळे पंढरपुरात भाजप विरोधात राष्ट्रवादीकडून अभिजित पाटील असा सामना पहायला मिळू शकतो.
गुरसाळे येथील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत मातब्बरांना मात अभिजित पाटील हे प्रकाशझोतात आले होते. साखर कारखाना क्षेत्रातील अभिजित पाटील हे आज मोठे नाव आहे.
राज्यातील तब्बल पाच साखर कारखाने चालवत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांबरोबरच त्यांचा भाजपशीही दोस्ताना होता, त्यामुळे अभिजित पाटील नेमके कुणाचे, असा प्रश्न विचारला जात होता, त्याला आज उत्तर मिळाले आहे.
अभिजीत पाटील यांनी पंढरपूर – मंगळवेढ्यामधून आगामी विधानसभेची तयारी सुरु केली आहे. पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवावी अशी त्यांच्या अनेक कार्यकर्त्यांची इच्छा होती.
पवार यांच्याशी त्यांचे असलेले संबंध यामुळे पंढरपूर विधानसभा मतदार संघातून पाटील यांना उमेदवारी मिळेल, अशी कार्यकर्त्यांना आशा आहे.
निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करुन उमेदवारी पक्की करुन घेण्याच्या दृष्टीनेही पाटील गटाने आज अखेर राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज