मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
जमिन वाटप व जागेत बैल बांधण्याच्या कारणावरून मुलाने व त्याच्या पत्नीने आई वडीलांना कु – हाडीच्या दांडयाने मारून आईचे दात पाडले तर वडीलांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याप्रकरणी मुलगा बंडू बापू भिंगे यास मंगळवेढयाचे न्यायाधीश आर.व्ही नडदगल्ली यांनी दोषी धरून दोन वर्षे सक्त मजुरीची व ५००० रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
या घटनेची हकिकत अशी , यातील फिर्यादी रतन बापू भिंगे ( वय ५२ ) व साक्षीदार वडील बापू दत्तू भिंगे ( दोघे रा , भिंगे वस्ती आंधळगांव ) येथील असून दि . १० जून २०१७ रोजी सकाळी ७ . ०० सम वा . हे घरासमोर थांबले असता आरोपी मुलगा बंडू तसेच सून निता बंडू भिंगे यांनी । जमिन वाटपाच्या कारणावरून व माझे तसे जागेत बैल का बांधला म्हणून चिडून । हातातील कु – हाडीच्या दांडयाने आरोपी ४ ह बंडू याने आई निता हिच्या तोंडावर मारल्याने दोन दात पडले .
यावेळी वडील साक्षीदार बापू दत्तू भिंगे ( वय ६० ) यांना लाथाबुक्याने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली होती . या घटनेचा तपास करून पोलिस उपनिरिक्षक दत्तात्रय पुजारी यांनी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते .
यामध्ये फिर्यादी व जखमी साक्षीदार तसेच वैद्यकिय अधिकारी डॉ .किरण टेकाळे यांची साक्ष महत्वाची ठरली . सरकारी वकिल दिलावर शेख यांनी साक्षीदार हे नैसर्गिक साक्षीदार आहेत , मुलाच्या विरोधात कुठलेही आईवडील खोटी साक्ष देवू शकत नसल्याचा मुद्दा न्यायालयाच्या समोर मांडल्यानंतर न्यायालयाने आरोपी बंडू भिंगे यास दोन वर्षे सक्त मजुरी व ५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली . तसेच आरोपी निता बंडू भिंगे हिस चांगल्या वर्तणूकीचे बंधपत्र घेवून फिर्यादी यांना ४ हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश केले .
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज