टीम मंगळवेढा टाईम्स ।
पंढरपूर तालुक्यातील कोरोना आटोक्यात आणण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. त्यामुळे 10 पेक्षा जास्त कोरोनाबाधित रुग्णसंख्या असणाऱ्या पंढरपूर तालुक्यातील 21 गावांमध्ये 25 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर या कालावधीत 14 दिवस कडक लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी याबाबतची माहिती दिली. पंढरपूर तालुक्यातील वाढती कोरोनाची संख्या पाहता 13 ते 23 ऑगस्ट या कालावधीत 10 दिवसांची संचारबंदी लागू करण्यात आली होती.
मात्र यादरम्यान ग्रामीण भागातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आटोक्यात आणण्यात प्रशासनाला यश आले नाही. त्यामुळे प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी बुधवारी बोलविलेल्या बैठकीत वरील निर्णय घेण्यात आला.
लॉकडाऊन होणारी गावे
कासेगाव, भंडीशेगाव, करपंब, गादेगाव, पटवर्धन कुरोली, भोसे, खेड भाळवणी, रोपळे, लक्ष्मी टाकळी, मेंढापूर, गुरसाळे, उपरी, चळे, खरातवाडी, लोणारवाडी, सुपली, गार्डी, खर्डी, सुस्ते, कोर्टी आंबे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज