टीम मंगळवेढा टाईम्स ।
एका विद्यार्थ्याने आपल्या सेवानिवृत्त शिक्षकाचीच फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. या विद्यार्थ्यांने सेवानिवृत्त शिक्षकास चांगल्या परताव्याचे आमिष दाखवून साडेबारा लाख रुपये गुंतवण्यास लावले.
शिक्षकाने परतावा व पैशाची मागणी केल्यानंतर चिठ्ठी लिहून आत्महत्येची धमकी दिली. याप्रकरणी सोहेल हजरत खान पटेल (रा. कांदा बझार, अक्कलकोट) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
सेवानिवृत्त शिक्षक सलीम शमशुद्दीन वळसंगकर (वय ६८ रा. रमाकांत कर्णिक नगर, जिजामाता उद्यान जवळ, सोलापूर) यांनी फिर्याद दिली असून एमआयडीसी पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे. ही घटना २१ ऑगस्ट २०२३ ते २५ जानेवारी २०२४ दरम्यान घडली.
पैसे घेऊन वर्ष उलटले तरी शिक्षकांना गुंतवणूक केलेल्या पैशाचा परतावा मिळाला नाही. त्यांनी आरोपीकडे विचारणा केली असता त्याने उडावाउडवीची उत्तरे दिली.
‘मला बीपी- शुगरचा त्रास आहे. तुम्ही परत पैसे मागितले तर तुमच्या नावाची चिठ्ठी लिहून आत्महत्या करेन,’ अशी धमकी दिल्याचे शिक्षकाने फिर्यादीत म्हटले आहे.
पंढरपूर येथील शाळेत असल्यापासून शिक्षकांशी ओळख
फिर्यादी हे सेवानिवृत्त शिक्षक आहेत. आरोपी सोहेल हा पंढरपूर येथील नगर परिषदेच्या शाळेत विद्यार्थी असल्यापासून त्याची वळसंगकर यांच्याशी ओळख होती. आरोपी हा २०२३ मध्ये फिर्यादीच्या घरी आला.
‘मी अॅमेझॉन इंटरनॅशनल व भारत पे नॅशनल कंपनीमध्ये गुंतवणूकदार म्हणून काम करतो,’ असे सांगून ओळखपत्र दाखवले.
सेवानिवृत्त शिक्षकास कंपनीत २ लाख ५० हजार रुपयांची गुंतवणूक केल्यास एका वर्षात ३ लाख ६५ हजार रुपये रक्कम जमा होईल, अशी बतावणी केली. फिर्यादीकडून १२ लाख ५० हजार रुपये घेतले.(स्रोत:दिव्य मराठी)
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज