टीम मंगळवेढा टाईम्स ।
भिमा सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामास करार केलेल्या ट्रॅक्टर ऊस वाहतूक करीत नसल्याने त्याची विचारणा करण्यासाठी गेलेल्या कारखान्याच्या दोन कर्मचार्यावर
कोयत्याने हाताच्या बोटावर वार करुन जखमी केल्याप्रकरणी ट्रॅक्टर मालक सिताराम किसन बाबर (रा.वडापूर ता.द.सोलापूर) याच्या विरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, यातील फिर्यादी अमित माने हे भिमा साखर कारखान्यात नोकरीस असून ते दि.25 रोजी रात्री 9.30 वाजता अरळी (ता.मंगळवेढा) येथील चव्हाण वस्तीवर गेल्यावर
आरोपी सिताराम बाबर यांच्याकडे भिमा कारखान्याकडे करार केलेला ट्रॅक्टर नं.एम.एच.13 सी.क्यू. 6545 हा ऊस वाहतूक का करीत नाही आम्ही तो ट्रॅक्टर कारखान्याच्या आवारात नेवून लावणार असल्याचे म्हणताच आरोपीने शिवीगाळी,
दमदाटी करीत धक्काबुक्की करुन हातातील कोयत्याने फिर्यादीच्या उजव्या हाताच्या तीन बोटावर व
सुरक्षारक्षक उमेश वाघमारे याच्या डाव्या हाताच्या मनगटावर कोयत्याने वार करुन जखमी केले असल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे याचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज