मंगळवेढा टाईम्स । बार्शी तालुक्यात व्यापाऱ्यांनी सकाळपासूनच बंदला स्वयंस्फुर्तिने पाठिंबा दिला. मुख्य बाजारपेठेसह छोटी मोठी ही दुकाने बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे बाजारपेठेत सगळीकडे शुकशुकाट होता.
सकल मराठा समाजाच्यावतीने प्रत्येकाच्या घरावर भगवा झेंडा या मोहिमेत हरएक बांधवाने सहभाग घेऊन मराठा आरक्षणाची मागणी केली. तर दुसरी शिवराज्य सेनेचे अध्यक्ष अॅड. हर्षवर्धन पाटील यांनी शिवाजीनगर,पंचायत समिती समोरील टाकीवर चढून एक मराठा लाख मराठा , मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे या घोषणा देवून शोले स्टाईल प्रयत्न केला.
दुसरीकडे आमदार राजेंद्र राऊत यांच्या घरासमोर मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने एक मराठा लाख मराठा,आरक्षण आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाचं अशा घोषणा देवून ठिय्या आंदोलन करण्यात आले.
यावेळी विविध पक्ष संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पाठिंबा आणि मनोगत व्यक्त केले. यावेळी सध्या काढलेली पोलीस भरती जोपर्यंत मराठा आरक्षणावरची स्थगिती उठत नाही तोपर्यंत काढू नये इतर सरकारी भरत्याही स्थगिती उठेपर्यंत थांबवण्यात याव्या.
आक्रोशाचा उद्रेक होण्याअगोदर मराठा समाजाच्या भावना लक्षात घेवून आरक्षण देण्याची मागणी यावेळी विविध आंदोलकांनी केली . तसेच आमदार राऊत यांनीही मराठा आरक्षणासाठी विधानसभेत बाजू लावून धरण्याचीही मागणी करण्यात आली.
यावेळी उपस्थित आंदोलकांनी हलगी वाजवत , आसूड ओढून आंदोलन केले. त्यानंतर आमदार राऊत यांना मराठा आरक्षणाच्या मागणीचे निवेदन देण्यात आले.
Youth’s shole style movement for Maratha reservation
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज