मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क।
उसाचे बिल मिळत नसल्याने आत्महत्या करीत असल्याची चिठ्ठी लिहून एका तरुण शेतकऱ्याने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. दि. २ ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजता शेतातील वस्तीवर त्यांने औषध प्राशन केल्यानंतर उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
उपचारादरम्यान, दि. ११ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता त्याचा मृत्यू झाला. सुनील चौडप्पा कुंभार (वय २८, रा. नागुरे, ता. अक्कलकोट) असे त्या आत्महत्या केलेल्या तरुण शेतकऱ्याचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, कुंभार यांनी धोत्री (ता. दक्षिण सोलापूर) येथील गोकुल होता. त्याचे अद्याप बिल मिळालेले नाही. ऊस जाऊन नऊ महिने झाले तरी पैसे मिळाले नाही.
पैशांची मागणी करूनही बील मिळाले नाही म्हणून दि.२ ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजता शेतातील शेतवस्तीवर सुनीलने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता.
त्यास तत्काळ सोलापूर येथील सिव्हील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान आठ दिवसांनी त्या शेतकऱ्याचा मृत्यू झाला.
सुनील यांच्या खिशात सापडली चिठ्ठी
विष प्राशन केलेले कुंभार यांची प्रकृती चिंताजनक असल्याने सोलापुरात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. सोमवारी रात्री उशिरापर्यंत सिव्हिल हॉस्पिटलमध्ये शवविच्छेदन करण्याचे काम सुरू होते. या दरम्यान सुनील यांच्या खिशात चिठ्ठी सापडली आहे.
मंगळवारी सकाळी त्यांच्यावर मूळगावी नागूर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. सुनील कुंभार यांच्या एका भावाचा यापूर्वीच मृत्यू झाला आहे. त्यांच्या पश्चात वडील, आई आहेत. सुनील अविवाहित होता. दोन बहिणी असून, त्यांचे लग्न झाले आहे.
मी अल्पभूधारक शेतकरी आहे. माझा ऊस गोकुळ कारखाना घेऊन गेला होता. त्याचे दीड लाखापर्यंत बिल आहे. वारंवार मागणी करूनही बील दिले नाही. बँक ऑफ महाराष्ट्र शाखा मैंदर्गी येथून कर्ज घेतले आहे.
बँक अधिकारी पैसे भरण्यास सांगत होते. एकीकडे कारखान्याकडून उसाचे बिल मिळत नव्हते, तर दुसरीकडे कर्ज भरण्यासाठी तगादा सुरू होता. या त्रासाला कंटाळून मुलाने आत्महत्या केली आहे. त्याच्या खिशात चिठ्ठी सापडली असून, त्यामध्ये या सर्व बाबीची नोंद आहे.-चौडप्पा कुंभार, मयत सुनील यांचे वडील
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज