टीम मंगळवेढा टाईम्स ।
ओमायक्रॉनच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मंगळवेढा तालुक्यातील सिद्धापूर येथील मातुर्लिंग गणपती यात्रा रद्द करण्यात आली आहे, अशी माहिती श्री.मातुर्लिंग गणपती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष भीमगोंडा पाटील यांनी दिली.
आमदार समाधान आवताडे व आ.प्रशांतराव परिचारक याच्या हस्ते व मातुलिंग ट्रस्ट अध्यक्ष व सदस्य , पदाधिकारी यांच्या उपस्थितीत श्री.मातुर्लिंग गणपतीची महापूजा १५ जानेवारी रोजी पहाटे सहा वाजता होणार आहे.
कर्नाटक महाराष्ट्रातील लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेले मातुर्लिंग गणपतीची यात्रा पुरातन काळापासून किंक्रांतीच्या दिवशी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत भरते.
परंतु तहसीलदार स्वप्निल रावडे, पोलीस अधिकारी, ग्रामविकास अधिकारी, तलाठी, सिद्धापूर मातुर्लिंग गणपती देवस्थानचे पदाधिकारी यांच्यासमवेत यात्रा भरण्याबाबत बैठक झाली.
या बैठकीत ओमायक्रॉनच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सदर यात्रा भरविता येणार नसल्याचे ठरले. यावर्षी शनिवार, दि.१५ जानेवारी रोजी मातुर्लिंग गणपती सिद्धापूरची यात्रा रद्द करण्यात आलेली आहे.
या दिवशी यात्रा स्थळी पोलीस पथकाकडून बंदोबस्त असणार आहे. तरी महाराष्ट्र कर्नाटकमधील सर्व भाविकांनी यात्रेसाठी येऊ नये, असे आवाहन श्री.मातुर्लिंग गणपती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष भीमगोंडा धुळगोंडा पाटील करीत आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज