
मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
बारावीच्या बोर्ड परिक्षेस जाणाऱ्या विद्यार्थ्याच्या मोटारसायकलला अज्ञात वाहनाची धडक बसल्यामुळे एक विद्यार्थी जागीच ठार तर एक जखमी झाल्याची घटना मोहोळ येथे घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की आज गुरुवार (ता .20) फेब्रुवारी रोजी एच. एस. सी बोर्ड परिक्षेचा सकाळी 11 ते 2 या वेळेत मराठी विषयाचा पेपर होता .परिक्षेस जाण्यासाठी नागनाथ विद्यालयातील 12 वी विज्ञान शाखेतील विद्यार्थी सौरभ दशरथ वाघ राहणार वाफळे व नेताजी विद्यालयातील विद्यार्थी स्वप्नील चव्हाण राहणार वाफळे, हे दोघे मोटारसायकलवर (एम. एच.सी.डब्लु 1053) मोहोळला परिक्षेस येत असताना महामार्गावर अज्ञात वाहनाने धडक दिल्याने सौरभ वाघ हा जागीच ठार झाला.
तर स्वप्नील चव्हाण हा किरकोळ जखमी झाला . मोटारसायकलची पुढे जाणाऱ्या सायकल स्वार दत्तात्रय दगडु घोरपडे राहणार गायकवाड वस्ती मोहोळ ( वय 5 5 ) हे जखमी झाले .जखमी अवस्थेतही स्वप्नील चव्हाण बोर्डाच्या मराठी विषयाच्या परिक्षेस उपस्थीत राहीला आहे. अधिक तपास पोलिस शिपाई अविनाश शिंदे करीत आहे.







बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज












