टीम मंगळवेढा टाईम्स। सोलापूर पूर्व भागातील कामगारांच्या आरोग्य तपासणीसाठी पोर्टेबल एक्स-रे मशीन घेण्यात आली आहे. या आधारे पुढील उपचारासाठी मदत होईल , असे आमदार प्रणिती शिंदे यांनी सांगितले. (X-ray machine to reach workers’ houses: MLA Praniti Shinde)
जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोनासंदर्भात रविवारी आढावा बैठक झाली. यानंतर आमदार शिंदे म्हणाल्या , कोरोनाला पराभूत करण्यासाठी प्रतिकारशक्ती महत्त्वाची आहे . शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखताना प्रशासनाला विडी कामगारांच्या आरोग्याची अधिक काळजी घ्यावी लागणार आहे.
अनेकदा रुग्णांमध्ये तत्काळ लक्षणे दिसत नाहीत. संशयित रुग्णांचे तत्काळ एक्स – रे काढणे आवश्यक आहे. एक्स – रे काढल्यानंतर तत्काळ उपचाराला सुरुवात करता येते. अनेक लोक भीतीमुळे रुग्णालयात जाऊन तपासणी करायला तयार नाहीत.
त्यांच्यासाठी आम्ही एक पोर्टेबल एक्स – रे मशीन खरेदी केली आहे . एका व्हॅनमध्ये ही मशीन थेट प्रभागात जाईल . त्यामुळे तत्काळ निदान होईल .
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज