टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा शहरातील रतनचंद शहा बँकेशेजारी,विश्वयुग कॉम्प्लेक्स येथे असलेले डॉ.रविंद्र नाईकवाडी हॉस्पिटलमध्ये आज महिला दिना निमित्ताने सर्वांसाठी मोफत त्वचेचे आजार,केसांचे विकार तपासणी व प्राथमिक औषध उपचार शिबीर आयोजित केले असल्याची माहिती डॉ.सौ.अश्विनी रविंद्र नाईकवाडी यांनी दिली आहे.
मंगळवेढा तालुक्यातील पहिले त्वचा व केस आणि आहार तज्ञ असलेल्या डॉ.सौ.अश्विनी रविंद्र नाईकवाडी यांनी डॉ.रविंद्र नाईकवाडी हॉस्पिटलमध्ये आज सोमवारी मोफत शिबीर आयोजित केले आहे.
यामध्ये नागरिकांची संपूर्ण आरोग्य तपासणी मोफत केली जाणार आहे. त्वचेचे आजार गजकर्ण, काळे डाग (वांग), सर्व प्रकारचे डाग,सोरायसिस, चेहऱ्यावरचे खड्डे, चामखीळ इत्यादी तपासणी होणार आहेत.तसेच केसांचे विकार , केस गळणे, केस कमी होणे, अतिदाट केस,अति विरळ केस,पांढरे केस इत्यादी तपासणी केली जाणार आहेत.
वजन जास्त असणे,लठ्ठपणा कमी असणे,सडपातळ त्यासंबंधीत असणारे आजार इत्यादी तपासणी होणार आहेत.त्याचबरोबर शुगर बी.पी,हृदयरोग, थोयराईड, इत्यादी संबंधित आजारांच्या आहाराविषयी माहिती देऊन तज्ज्ञाकडून मोफत तपासणी व निदान उपचार केले जाणार आहेत.
सर्वांसाठी अत्यंत आवश्यक असणारी सी.बी.सी रक्ताचे व पेशींचे प्रमाण असणारी ही स्पेशल तपासणी फक्त 100 रुपयांत या प्रसंगी नागरिकांना करता येणार आहे.
आज महिला दिना निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या सर्वांसाठी मोफत त्वचेचे आजार,केसांचे विकार तपासणी व प्राथमिक औषध उपचार शिबीराचा सर्वानी लाभ घ्यावा असे आवाहन डॉ.रविंद्र नाईकवाडी यांनी केले आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज