टीम मंगळवेढा टाईम्स ।
दामाजी कारखान्याच्या निवडणुकीप्रमाणे पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिकेच्या निवडणुकीत समविचारीच्या माध्यमातून लढवण्याबाबत इथल्या मंडळीचा विचार घेऊन निर्णय घेतला जाईल मात्र विधानसभेचा निर्णय जेष्ठाच्या मार्गदर्शनाखाली घेतला.
पुढच्या काळात जे होईल ते शेतकऱ्याच्या भल्यासाठी होईल याचे संकेत देत शेतकऱ्याच्या भल्यासाठीच आमचे वैचारिक मतभेद बाजूला ठेवल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादीचे नेते भगीरथ भालके यांनी व्यक्त केले.
तालुक्यात नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत समविचारी आघाडीतील विजयी सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार तालुक्यातील मारोळी येथे आयोजित करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी दामाजी कारखान्याचे अध्यक्ष शिवानंद पाटील, उपाध्यक्ष तानाजी खरात, संचालक औदुंबर वाडेकर,भाजप तालुकाध्यक्ष गौरीशंकर बुरकुल,रेवणसिध्द लिगाडे,भारत बेदरे,भारत पाटील,रामेश्वर मासाळ,लतीफ तांबोळी,युन्नश शेख,रामेश्वर मासाळ,बसवराज पाटील,नितीन पाटील गुलाब थोरबोले,सुरेश कोळेकर,राजकुमार पाटील,खुदा शेख,आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना भालके म्हणाले की,दामाजी कारखान्याच्या निवडणुकीत इथल्या सभासद व शेतकऱ्यांच्या हितासाठी एकत्र येण्याची भुमिका मांडली,त्यात राजकारण न करता इथल्या नेतेमंडळीची भुमिका ऐकून त्यात सहमती दर्शवली,
साखर कारखाना शेतकऱ्याचा मालकीचा रहावा ही भूमिका सर्वसामान्य सभासद शेतकऱ्यांची होती म्हणून आमचे वैचारिक मतभेद बाजूला ठेवून समविचारी आघाडीच्या माध्यमातून दामाजी कारखान्याची निवडणूक लढवली,
पण तालुक्याच्या विकासासाठी आम्ही एकत्र आल्याने अनेकांना पोटसुळ उठल्याचा आरोप करत कारखान्यात सत्ताबदल झाला समविचारीच्या माध्यमातून अध्यक्ष शिवानंद पाटील,उपाध्यक्ष तानाजी खरात यांनी चांगल्या पध्दतीने काम केले शेतकय्राची बिले अदा केली.
संचालक मंडळाला हक्काने बोलू शकता,आगामी निवडणुका सर्व विचारीच्या माध्यमातून लढण्यावर सर्वांना मते जे काय ठरेल ते ठरेल मात्र विधानसभा निवडणुकीत मात्र तुम्हाला योग्य निर्णय दिसेल असा संकेत दिला.
मा.आ.प्रशांत परिचारक म्हणाले की, तालुक्यातील शेतकरी सभासदांसाठी आमचे राजकीय जोडे बाजूला ठेवले, गावपातळीवरील सरपंचांनी केंद्र व राज्य सरकारच्या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी योगदान द्यावे,
आरोग्य,घरकुल व इतर अनेक योजना आहेत.त्यासाठी सरपंच हाच गावपातळीवरील पंतप्रधान आहे. संचालक बसवराज पाटील यांनी प्रास्ताविक केले. सुत्रसंचालन भारत मुढे यांनी केले.(स्त्रोत:सकाळ)
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज