टीम मंगळवेढा टाईम्स।
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघ हा महायुतीत शिवसेनेचा पारंपारिक मतदारसंघ होता. गत निवडणुकीत वरिष्ठांच्या सांगण्यावरून शिवसेनेने माघार घेतली होती. पण आमचा हक्काचा मतदारसंघ आमच्या वाट्याला यावा अशी मागणी शिवसेना शिंदे गटाकडून होत आहे.
युवा सेनेचे जिल्हाप्रमुख बालाजी बागल, शिवसेना प्रणित शेतकरी सेनेचे जिल्हाप्रमुख रामचंद्र जाधव, शिवसेना तालुकाप्रमुख अशोक चौंडे यांनी उघडपणे मागणी केली आहे.
तसेच या मतदारसंघातून शिवसेनेकडून आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे, भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत हे निवडणूक लढवतील अशी घोषणाही केली आहे. त्यामुळे अनिल सावंत हे पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवतील का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
पंढरपूर आणि मंगळवेढा या दोन्ही तालुक्यात अनिल सावंत हे फक्त आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे एवढी त्यांची ओळख नसून त्यांनी स्वतःचे अस्तित्व या दोन्ही तालुक्यात निर्माण केले आहे.
याआधी कोणतीही निवडणूक न लढविता त्यांनी सर्वसामान्य माणसांच्या कामाला मोठे प्राधान्य दिले आहे.
मंगळवेढा तालुक्यातील लवंगी या गावात केवळ त्या भागातील ग्रामस्थांच्या मागणीनुसार कसलीही भौगोलिक परिस्थिती न बघता आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी साखर कारखाना उभा करून या भागातील नागरिकांना खऱ्या अर्थाने न्याय देण्याची भूमिका पार पाडली आहे.
आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या माध्यमातून मंगळवेढा तालुक्यात निंबोणी येथे ग्रामीण रुग्णालय व तसेच नंदेश्वर येथे नुकतेच विशेष बाब म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर केले आहे. याशिवाय कुठेही नैसर्गिक आपत्ती घडू द्या अथवा एखाद्या माणसाला अडचण येऊ द्या तिथे अनिल सावंत यांनी आर्थिक मदत केली आहे.
याशिवाय कुस्ती स्पर्धा, क्रिकेट स्पर्धा, विविध जयंती, जत्रा अशा विविध कार्यक्रमांना मोठी मदत केली आहे. मदतीसाठी जो माणूस त्यांच्यापर्यंत पोहोचला त्या सर्वांना त्यांनी मदत केली आहे. यामुळे ज्या माणसाला आम्ही काहीच दिले नाही तो माणूस जर आम्हाला एवढी मदत करत असेल असा माणूस जर आमच्याकडे मदतीसाठी आला तर आम्ही उघड मदत करू अशी भूमिका वारंवार नागरिकांनी व्यक्त केली आहे.
याशिवाय आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी पंढरपूर शहरात व तसेच तालुक्यात अनेक विकासकामे मार्गी लावली आहे.
आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात वातावरण ढवळून निघत आहे. विद्यमान आमदार समाधान आवताडे हे उमेदवारी निश्चित समजून कामाला लागले आहेत.
तर विधान परिषदेचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी मतदारसंघात कार्यकर्ता मेळाव्याचा सपाटा चालू ठेवून कसल्याही परिस्थितीत निवडणूक लढविणार अशी जणू घोषणाच केली आहे.
आणि आता या मतदारसंघावर शिंदे गटाने दावा करत अनिल सावंत यांच्यासारखा तगडा उमेदवार समोर येतोय त्यामुळे महायुतीत मोठा तिढा निर्माण होण्याची शक्यता निर्माण होतेय.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज