टीम मंगळवेढा टाईम्स ।
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघांमध्ये शेतकऱ्यांच्या वीजप्रश्न अनुषंगाने नवीन डीपी व सबस्टेशन यांच्या निर्मितीसाठी आपण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करून यासंदर्भात भरीव निधीची मागणी करणार असल्याचे आमदार समाधान आवताडे यांनी सांगितले आहे.
मतदार संघातील पंढरपूर व मंगळवेढा तालुक्याचा गाव भेट दौरा करत असताना अनेक शेतकरी व नागरिकांनी आमदार आवताडे यांच्याकडे पुरेशा वीज उपलब्धतेची मागणी करत असताना नवीन डीपी व सर्व स्टेशन उभा करण्याची मागणी केली आहे.
शेतीला पाणी देण्यासाठी पुरेसा वीज दाब उपलब्ध होत नसल्याने मोटार यंत्र जळणे व वीज पुरवठ्याच्या संदर्भात इतर समस्या निर्माण होत असल्याची गाऱ्हाणी आमदार आवताडे यांच्या समोर शेतकऱ्यांनी मांडल्या या निधीची मागणी करणार असल्याचे सांगितले.
मतदारसंघातील मंगळवेढा तालुक्यामध्ये आ आवताडे यांचा ४२ विभागांच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांसमवेत गावभेट दौरा सुरु आहे. आमदार आपल्या दारी अभियाना अंतर्गत आ आवताडे यांनी रविवारी बठाण, उचेठाण, धर्मगांव, ढवळस, शरदनगर, मल्लेवाडी, घरनिकी, मारापूर या गावांचा दौरा करुन जनतेच्या अडी-अडचणी व समस्या जाणून घेतल्या आहेत.
सर्वसामान्य जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र व राज्य सरकारच्या अनेक योजना असून त्या योजना अंतर्गत लाभार्थी असणाऱ्या नागरिकांना योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी विनाकारण कागदी घोडे न नाचवता जनतेला जास्तीत-जास्त सुविधा उपलब्ध होण्यासाठी प्रयत्नशील असणे गरजेचे आहे.
उचेठाण येथील गावअंतर्गत असणाऱ्या व दैनंदिन रहदारीसाठी अतिशय महत्वपूर्ण रस्त्याचे काम अनेक दिवसांपासून रखडले आहे त्या रस्त्याबाबत आ आवताडे यांनी ग्रामस्थांच्या व्यथा जाणून सदर रस्ता लवकरत-लवकर नागरिकांसाठी सुधारणा अवस्थेत उपलब्ध करुन देण्याच्या सूचना दिल्या असता, हा रस्ता येत्या ८ ते १० दिवसांमध्ये तयार करुन देण्याचे संबंधित विभागाने मान्य केले आहे.
त्याचबरोबर अनेक गावांमध्ये आमदार स्थानिक निधी व इतर निधीतून मंजूर झालेली विविध विकास कामे अपूर्ण अवस्थेत असून ती त्वरित पूर्ण करण्याच्या सूचना आ.आवताडे यांनी दिल्या आहेत.
तसेच तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जलजीवन मिशन अंतर्गत मंजूर कामे दर्जात्मक पद्धतीने करण्याचे आ.आवताडे यांनी सूचित केले आहे. नागरिकांच्या व गावाच्या भौतिक विकास दृष्टीने या योजनेची कामे खूप महत्वाची असल्याने गुणवत्तेच्या बाबतीत आपण कोणतीही हयगय खपवून घेणार नसल्याचे आ आवताडे यांनी स्पष्ट केले आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज