टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा तालुक्यातील फटेवाडी ग्रामस्थांनी बिनविरोधची परंपरा कायम ठेवत ग्रामपंचायतीच्या जनतेतून सरपंचपदी सीमा प्रकाश काळुंगे यांच्यासह सात सदस्यांची बिनविरोध निवड केली आहे.
फटेवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी तीन अर्ज दाखल झाले होते. अर्ज माघारी घेण्याच्या अखेरच्या दिवशी दोघांनी अर्ज माघारी घेतल्याने सीमा काळुंगे यांची बिनविरोध निवड झाली आहे.
फटेवाडी ग्रामस्थांनी सलग दुसरी पंचवार्षिक निवडणक सर्व संमतीने सरपंच व सदस्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
नूतन ग्रामपंचायत सदस्यपदी पल्लवी दिगंबर शिंदे, देवाप्पा ज्ञानेश्वर इंगोले, सुनीता सुरेश मोटे, शरिफा पैगंबर बारगीर, विनोद भारत आवताडे, हाऊसाबाई अर्जुन चव्हाण, दत्तात्रय बाबूराव थोरवत यांची बिनविरोध निवड झाली आहे.
ग्रामपंचायत बिनविरोध करण्यासाठी दामाजीचे संचालक औदुंबर वाडदेकर, रावसाहेब फटे, दगडू फटे, शिवाजी अवताडे, प्रकाश काळुंगे, मारुती लेंडवे, सिद्राम शिंदे, संभाजी इंगोले, भीमराव चव्हाण, माजी सरपंच राजेंद्र फटे, विष्णुपंत फटे, संदीप वाडदेकर, प्रवीण फटे यांनी प्रयत्न केले.
प्रकाश काळुंगे यांच्या वाढदिनी पत्नी बनल्या सरपंच
प्रकाश काळुंगे हे कचरेवाडी तालुका मंगळवेढा येथील असून, फटेवाडी हे त्यांच्या मामाचे गाव आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ते फठेवाडी येथे राहत आहेत.
दि. ७ नोव्हेंबर रोजी प्रकाश काळुंगे यांचा वाढदिवस असून त्यांच्या वाढदिवसाला मामा मंडळींनी भाच्याच्या पत्नीला सरपंच करीत अनोखी भेट दिली आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
![ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा](https://mangalwedhatimes.in/wp-content/uploads/2021/12/WhatsApp-Add.gif)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज