mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

निवडणुकीनंतर महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असेल? शरद पवारांनी मुख्यमंत्रिपदाचा पत्ता खोलला

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
November 9, 2024
in राज्य
एका बाजूला यांची मोदींची गॅरंटी आणि दुसऱ्या बाजूला दर दिवसाला शेतकरी आत्महत्या करतोय; ही स्थिती किती दिवस चालू द्यायची; शरद पवारांनी साधला निशाणा

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।

निवडणुकीनंतर महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असेल अशी चर्चा सुरू असताना ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी एक महत्वपूर्ण वक्तव्य केलं आहे.

विधानसभा निवडणुकीनंतर आम्ही सगळे एकत्र बसू, ज्यांचे आमदार जास्त त्या पक्षाला मुख्यमंत्रिपदासाठी आम्ही पाठिंबा देऊ.

तशी माझ्या पक्षाची भूमिका आहे असं शरद पवारांनी स्पष्ट केलं. ‘मुंबई तक’ या माध्यमाला मुलाखत देताना शरद पवारांनी हे वक्तव्य केलं आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस हे काय भूमिका घेतात हे पाहावं लागेल.

ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाईंनी घेतलेल्या मुलाखतीत महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री कोण असेल असा प्रश्न त्यांनी शरद पवार यांना विचारला. त्यावर शरद पवार म्हणाले की,

“निवडणुकीनंतर आम्ही सगळे एकत्रित बसू. ज्यांच्या पक्षाचे आमदार जास्त असतील त्यांना त्यांचा प्रतिनिधी निवडायला सांगू आणि त्याला आम्ही पाठिंबा देऊ. ही माझ्या पक्षाची भूमिका आहे.”

ठाकरे गट काय करणार?

राज्यात ज्यावेळी विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या तेव्हापासून महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करा अशी भूमिका उद्धव ठाकरे यांनी घेतली होती. महाविकास आघाडीचा जो कोणीही उमेदवार असो, त्याच्या पाठीशी आपण राहू असंही उद्धव ठाकरे म्हणाले होते.

तर उद्धव ठाकरे यांना महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करा अशी भूमिका शिवसेनेच्या नेत्यांनी घेतली होती. त्यावर काँग्रेस आणि राष्ट्रवादीने मात्र त्यावेळी कोणतीही भूमिका स्पष्ट केली नव्हती.

काँग्रेस- ठाकरेंची मुख्यमंत्रिपदावर वेगवेगळी भूमिका

लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसला मोठं यश मिळाल्यानंतर त्या पक्षाच्या नेत्यांचा आत्मविश्वास वाढल्याचं दिसून आलं. त्यामुळे ज्यांचे आमदार जास्त त्यांचा मुख्यमंत्री अशी भूमिका काँग्रेसमधील काही नेत्यांनी घेतल्याची चर्चा होती. पण असं केल्यास मित्रपक्षांमध्ये आपले आमदार जास्त निवडून आणण्यासाठी सहकारी पक्षाचे आमदार पाडण्याची स्पर्धा लागू शकते असं ठाकरे गटाकडून स्पष्ट करण्यात आलं होतं.

त्यावर राष्ट्रवादीकडून मात्र कोणतीही भूमिका स्पष्ट होत नव्हती. त्यामुळे महाविकास आघाडीने मुख्यमंत्रिपदासाठी कोणताही फॉर्म्युला जाहीर केला नाही किंवा मुख्यमंत्रिपदाचा चेहराही समोर केला नाही.

ज्यांचे आमदार जास्त त्यांचा मुख्यमंत्री

महाविकास आघाडी म्हणून तीनही पक्षांनी निवडणुकीला एकत्रित सामोरं जायचं आणि मुख्यमंत्रिपदाबाबत निवडणुकीनंतर निर्णय घ्यायचा ही भूमिका नेत्यांनी घेतली होती. आता शरद पवारांनी मुख्यमंत्रिपदावर त्यांच्या पक्षाची भूमिका जाहीर केली आहे.

ज्यांचे आमदार जास्त त्या पक्षाचा मुख्यमंत्री ही आपल्या पक्षाची भूमिका असल्याचं शरद पवार म्हणाले. त्यावर आता महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस काय भूमिका घेणार हे पाहावं लागेल.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: शरद पवार

संबंधित बातम्या

पिकांना दिलासा! सोलापूर जिल्ह्यात परतीच्या पावसाचा हाहाकार, ‘या’ तालुक्यात वीज पडून महिला व तरुण ठार; ४ शेळ्या दगावल्या

सावधान! हवामानत मोठा बदल ‘या’ तारखे दरम्यान वादळी पावसाची शक्यता, शेतकऱ्यांनी उपाययोजना कराव्यात; कृषी विभागाचं आवाहन

April 19, 2026
खळबळ! मंगळवेढा तालुक्यात पंतप्रधान किसान सन्मान योजनेत तब्बल २ हजार ६०० बोगस लाभार्थी

बनावट दस्तऐवज तयार करून पतसंस्थेत साडेसहा कोटींचा अपहार; ३६ जणांवर फसवणुकीचा गुन्हा; अशी झाली फसवणूक?

April 18, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

शाळांमधून ‘या’ साहित्य खरेदीची सक्ती करू नका; अन्यथा कारवाई, शिक्षण विभागाचा कडक इशारा

April 18, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

धक्कादायक! अविवाहित तरुणीचा गर्भपाताच्या गोळ्यांच्या अतिसेवनाने मृत्यू; रक्तदाब कमी झाला, झटके आले अन्…

April 16, 2026
Gas booking Number : आता गॅस बुकिंगसाठी संपूर्ण देशात एकच नंबर; जूना नंबर करा डिलिट

खळबळ! गॅसचा काळाबाजार उघडकीस; १०३ गॅस सिलिंडरसह १० लाखांचा मुद्देमाल जप्त; अनेक ठिकाणी काळाबाजार सुरूच

April 16, 2026
न्यूरोसर्जन डॉ.शिरीष वळसंगकर प्रकरणाला वेगळं वळण; आरोपी महिलेच्या वकिलाचा मोठा खुलासा

बापरे..! सोलापुरातील वकिलास जीएसटीची १२१ कोटी दंडाची नोटीस; काय आहे नेमके प्रकरण?

April 17, 2026
शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा; पोलीस संरक्षणासह ‘ही’ फी बंद करणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

कामाची बातमी! ‘या’ परवानग्यांचे अधिकार आता थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा मोठा निर्णय

April 9, 2026
बाबो..! अशोक खरातच्या मोबाइलमधील डेटा पाहून पोलीसही चक्रावले, धक्कादायक माहिती समोर; पुन्हा गूढ वाढले

मोठी बातमी! भोंदूबाबाचा पाय आणखी खोलात; अशोक खरात विरोधात ‘हा’ गुन्हा दाखल

April 6, 2026
जनता संभ्रमात! भगीरथ भालकेंचे नेमकं चाललंय तरी काय, दोन दिवसात दोन वेगवेगळ्या पक्षाकडून भरले अर्ज; पंढरपूर-मंगळवेढ्याच्या जागेबाबत सस्पेन्स आणखी वाढला?

जनता संभ्रमात! भगीरथदादा, तुमची निष्ठा नेमकी कुणाकडे? ​बीआरएस, काँग्रेस, राष्ट्रवादी अन् आता शिवसेना; भालकेंच्या वारंवार बदलणाऱ्या भूमिकांमुळे कार्यकर्त्यांमध्ये संताप

April 6, 2026
Next Post
धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

धक्कादायक! बाजारात धक्का लागल्याच्या कारणाने चाकूने भोसकून कामगाराचा खून; पोलिसात गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या हस्ते देवेंद्र फडणवीसांचा सत्कार; मालकांनी ठरल्याप्रमाणे केलं… आता संधी मिळणार का? परिचारक समर्थकांचा सवाल

​आता नाही तर कधीच नाही! परिचारकांच्या आमदारकीचा मार्ग मोकळा की भाजप पुन्हा धक्का देणार? विधान परिषदेच्या निवडणुकीने राजकारण तापलं; पालकमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं..

April 19, 2026
पिकांना दिलासा! सोलापूर जिल्ह्यात परतीच्या पावसाचा हाहाकार, ‘या’ तालुक्यात वीज पडून महिला व तरुण ठार; ४ शेळ्या दगावल्या

सावधान! हवामानत मोठा बदल ‘या’ तारखे दरम्यान वादळी पावसाची शक्यता, शेतकऱ्यांनी उपाययोजना कराव्यात; कृषी विभागाचं आवाहन

April 19, 2026
सांगोल्यात जुगार खेळणाऱ्या सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

धाबे दणाणले! मंगळवेढ्यात जुगाराचा अड्डा उद्ध्वस्त; १२ जणांना खेचत आणले पोलीस ठाण्यात; PSI नागेश बनकर यांची धडक कारवाई

April 19, 2026
तयारी! बँक ठेवी विमा संरक्षण ‘एवढ्या’ लाखांपर्यंत वाढवण्याचा विचार; सध्या मर्यादा ५ लाख; खातेधार व ठेवीदारांना याचा होणार लाभ

बँकेने जप्त केलेल्या मालमत्तेचे सील तोडून अनधिकृत प्रवेश; मंगळवेढ्यातील कर्जदारावर गुन्हा दाखल

April 19, 2026
सबजेल हाऊसफुल्ल पंढरपूरचे कैदी मंगळवेढ्यात वर्ग; कोरोना संसर्गाची कैद्यांना भीती

सावधान! मंगळवेढ्यात ‘हनी ट्रॅप’ स्टाईलने लूट करणारी टोळी गजाआड; LCB ची धडाकेबाज कारवाई, महिला आरोपी अटकेत

April 19, 2026
विद्यार्थ्याने गळफास घेतला; मराठा आरक्षणाच्या स्थगितीमुळे आत्महत्या केल्याचा दावा

काम आटोपून माय-बाप घरी परतले, समोर मुलाचा मृतदेह दिसताच फोडला टाहो; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावावर शोककळा

April 19, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा