मंगळवेढा टाईम्स न्युज ।
आरोप-प्रत्यारोपाने सुरू असलेल्या प्रचार आता शिगेला पोहचला असून २० डिसेंबर रोजी मतदान होणार आहे तर निवडणूकीचा निकाल २१ डिसेंबर रोजी लागणार आहे.

तत्पूर्वी मतदानात मतदारराजा आपला कौल, आपली पसंती कोणाला देणार यावर आता मोठमोठ्या पैजा लागत असल्याचे चित्र दिसत आहे. ‘कोण कोणाला ठरणार भारी अन् कोण होणार मंगळवेढा शहराची कारभारीन’ है। पाहण्यासाठी आता सर्वांचे लागून राहिले आहे.

मंगळवेढा नगरपरिषद निवडणूकीत आमदार समाधान आवताडे, अजित जगताप यांना सत्तेपासून रोखण्यात तीर्थक्षेत्र विकास आघाडी यशस्वी होणार का? याची कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे.
या निवडणुकीत अजित जगताप यांनी भाजप पक्षाचे कमळ हाती घेत तीर्थक्षेत्र विकास आघाडीशी दिलेली टक्कर ही चर्चेचा विषय ठरली.

भाजप उमेदवार सुजाता जगताप यांना निवडून आणण्यासाठी आमदार समाधान आवताडे व त्यांचे कुटुंबीय प्रचारात सक्रिय झाले आहे. तर तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या सुनंदा आवताडे यांनी देखील काटे की टक्कर दिली असल्यामुळे ही निवडणूक नव्या वळणावर येऊन ठेपली आहे.

यामध्ये आता भाजप नेमका कोणता राजकीय डाव टाकणार? तीर्थक्षेत्र विकास आघाडी डाव कसा हाणून पडणार यावर राजकीय जाणकारांकडून तर्कवितर्क लावले जात आहेत.
या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे अनेक बडे राजकीय पुढाऱ्यांनी आपली भूमिका गुलदस्त्यात ठेवली आहे हे विशेष!

मंगळवेढ्याचे राजकारण
मंगळवेढ्याच्या राजकारणात हे व्यक्ती केंद्रीत राजकारण असून यामध्ये पक्ष, आघाडी याचा फरक कितपत पडेल यावर असा चर्चा सुरू असून गेली निवडणूक व आताची निवडणूक पक्षाच्या चिन्हावर घेतली असून त्यामुळे पक्षाचा आघाडीचा काय फरक पडेल हे 21 डिसेंबर रोजी समजणार आहे. पण कधी काय होईल हे काय सांगता येत नाही.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज












