टीम मंगळवेढा टाईम्स।
मुसळधार पावसामुळे मेडिकलमध्ये शिरलेल्या पाण्यातून साहित्य काढताना उजव्या हाताच्या तळव्याला व बोटाला इन्व्हर्टर बॅटरीचा इलेक्ट्रिक शॉक बसून मेडिकल व्यावसायिकाचा उपचारापूर्वी मृत्यू झाला. ही घटना रात्री ९:३० च्या सुमारास (रा. महात्मा फुले चौक, सांगोला) येथे घडली.
सुधीर अरविंद येलपले, (वय ३५ रा. सांगोला) असे मृताचे नाव आहे. त्याच्या पश्चात आई-वडील, बहीण, पत्नी दोन मुले असा परिवार आहे. रक्षाबंधन सणाच्या दिवशीच दुर्दैवी या घटनेमुळे सांगोला शहरात हळहळ व्यक्त होत आहे.
याबाबत अनिल भीमराव शेळके (रा. वाकीशिवणे, ता सांगोला) यांनी खबर दिली असून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
सांगोला महात्मा फुले चौकातील येलपले बिल्डिंगमधील सुधीर येलपले यांचे मेडिकल आहे. सोमवारी रात्री ८:३० वाजता मेडिकल बंद करून सुधीर घरी परतले होते.
दरम्यान रात्री ९ च्या सुमारास अचानक मुसळधार पाऊस पडल्यामुळे त्यांच्या दुकानात पाणी शिरले होते. तर वीजपुरवठाही खंडित झाला होता. त्यावेळी सुधीर येलपले मेडिकलमधील साहित्य
व इन्व्हर्टर बॅटरी भिजू नये म्हणून ते काढत असताना त्यांच्या उजव्या हाताच्या तळव्याला व बोटाला बॅटरीचा इलेक्ट्रिक शॉक बसून मृत्यू झाला. पुढील तपास पोलिस हवालदार केदारनाथ भरमशेट्टी करीत आहेत.
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 99 70 76 6262 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 99 70 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
विश्वसनीय ऑनलाईन पोर्टल ‘मंगळवेढा टाईम्स’ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 75 88 214 814
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज