मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क।
सध्या महिला प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर आहे. घर सांभाळून बाहेर नोकरी करतात. त्याचसोबत मुलांचा, कुटुंबाचा सांभाळ करतात. या काळात लहान मुल असताना नोकरी करताना महिलांची खूप धावपळ होते.
त्यांना दोन्ही गोष्टी सांभाळताना खूप कठीण जाते. त्यामुळेच आता नोकरदार महिलांसाठी एक खास योजना सुरु केली जाणार आहे.
नोकरदार महिलांच्या मुलांना सुरक्षित वाटावे. याचसोबत त्यांचे योग्य संगोपन व्हावे, या उद्देशाने पाळणा योजना सुरु केली जाणार आहे. यामध्ये नोकरदार महिलांच्या मुलांना पोषण, शिक्षण आणि सुरक्षित वातावरण मिळणार आहे. या योजनेत लहान मुलांसाठी पाळणा घर सुरु केले जाणार आहे.
पहिल्या टप्प्यात ३४५ पाळणा घरे
सरकारच्या या नवीन योजनेत पहिल्या टप्प्यात ३४५ पाळणा घर सुरु केले जाणार आहे. यासाठी लागणारा ६० टक्के निधी केंद्राकडून तर ४० टक्के राज्य सरकारकडून उपलब्ध करुन दिला जाणार आहे. केंद्र सरकारने २९ फेब्रुवारी २०२४ रोजी योजनेला मान्यता दिली होती. त्यानंतर आता ही योजना प्रत्यक्षात राबवली जाणार आहे.
पाळणा योजना नक्की आहे तरी काय?
नोकरदार वर्गातील महिलांना आपल्या मुलांना सुरक्षित ठिकाणी ठेवण्यासाठी एक केंद्र उपलब्ध असणार आहे. मुलांना तिथे सुरक्षित वातावरण उपलब्ध असणार आहे.
सुरक्षित वातावरण
६ महिने ते ६ वर्षांच्या वयोगटातील मुलांसाठी डे केअर सुविधा
शिक्षण
३ वर्षांखालील मुलांना पूर्वी उद्दीपन आणि ३ ते ६ वर्षांच्या मुलांना पूर्व शालेय शिक्षण दिले जाईल
आहार
मुलांना सकाळी नाश्ता, दुपारी जेवण, संध्याकाळचा नाश्ता दिला जाईल
आरोग्य सेवा
नियमित आरोग्य तपासणी, लसीकरण आणि मुलांच्या वाढीवर लक्ष दिले जाणार आहे.
आधुनिक सुविधा
मुलांना वीज, पाणी, शौचालय अशा मुलभूत सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातील.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज