राजेंद्र फुगारे । स्त्री म्हणजे शक्ती आणि तिची आराधना करणे म्हणजे पुण्य असे पुराणात सांगितले आहे. पोटी एक मुलगी जरूर असावी, तिच्या जन्मावर आनंदाने बर्फी वाटावी, बेटी,धनाची पेटी असे बाबाला गर्वाने वाटावे.असाच अभिमान पंढरपूर तालुक्यातील चळे येथील डॉ.सुहास हरी मोरे यांना वाटत आहे. त्यांना रविवार दिनांक 12 जुलै रोजी कन्यारत्न प्राप्त झाले. त्या कन्येच्या जन्माचा स्वागत सोहळा मोठ्या दिमाखाने डॉ. सुहास मोरे व मोरे परिवाराने साजरा केला. Pandhrpur Welcoming the birth of a girl with fireworks, free health check up
गावातील मुख्य चौकांमध्ये फटाके फोडून मुलीच्या जन्माचा स्वागत सोहळा साजरा केला.तसेच डॉक्टर सुहास मोरे यांच्या आनंद हेल्थ क्लिनिक सेंटर मध्ये आज जवळपास दीडशे ते दोनशे लोकांचे मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. मोठमोठ्या शहरांमध्ये मुलीच्या जन्माचे स्वागत होत असताना ग्रामीण भागांमध्ये सुद्धा डॉक्टरांनी व मोरे परिवाराने मुलीच्या जन्माचे स्वागत केल्याने मुलींचा सन्मान वाढण्यास निश्चितपणे मदत झाली आहे.
डॉक्टर सुहास मोरे यांचे पुणे येथील शेवाळवाडी येथे आनंद हेल्थ हॉस्पिटल 2016 पासून सुरू आहे. डॉक्टर मोरे यांनी नेहमीच सामाजिक बांधिलकी जपली आहे. हॉस्पिटल ची सुरुवात झाल्यापासून शिवजयंती,15 ऑगस्ट,26जानेवारी,बालदिन,महिला दिन ,या दिवशी त्यांनी त्यांच्या हॉस्पिटलमध्ये रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी,रक्तगट तपासणी,महिलांची हिमोग्लोबिन तपासणी असे उपक्रम करत आहेत.काही महिन्यांपूर्वीच डॉक्टर मोरे यांनी चळे येथे आनंद हेल्थ क्लिनिक सुरू करून चळे येथील रुग्णाची सेवा करत आहेत. व काल त्यांनी कन्यारत्न प्राप्तीचा आनंद मोफत आरोग्य तपासणी करून साजरा केला. या अनोख्या पद्धतीने मुलीच्या जन्माचे स्वागत केल्याने गावातील नागरिकांकडून कौतुक होत आहे.
आम्हाला कन्यारत्न प्राप्त झाले तिच्या आगमनाचे स्वागत म्हणून आमच्या आनंद हेल्थ क्लिनिक चळे येथे मोफत आरोग्य तपासणी केली आहे.सर्वांनीच मुलीच्या जन्माचे स्वागत केले पाहिजे. ही तपासणी करताना सोशल डिस्टंसिंग काटेकोरपणे पालन करण्यात आले होते.-डॉ.सुहास मोरे,चळे
मी आज दवाखान्यांमध्ये आलो असता डॉक्टरांना मुलगी झाल्यामुळे मोफत तपासणी करण्यात आली.सर्वांनी याचा आदर्श घ्यावा.मुलीच्या जन्माचे स्वागत झाले पाहिजे.- पांडुरंग नागनाथ काळे, चळे ग्रामस्थ
—————————
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज