टीम मंगळवेढा टाईम्स ।
साप्ताहिक मंगळवेढा वेध 9 वा वर्धापन दिन सोहळा आज सोमवार दि. 13 फेब्रुवारी 2023 रोजी सप्तश्रृंगी मंगल कार्यालय धर्मगाव रोड, मंगळवेढा येथे दुपारी 3 वा.
मान्यवरांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रमाने तसेच पुरस्कार वितरण सोहळा होणार असल्याचे कार्यक्रमाचे संपादक शिवाजी केंगार यांनी सांगितले.
साप्ताहिक मंगळवेढा वेध वर्धापन दिन सोहळा व वेध परिवाराच्या वतीने विविध क्षेत्रातील गुणीजनांचां सन्मान सोहळा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते होईल.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून प्रसिध्द व्याख्याते अविनाश भारती तसेच कागष्ट गावची कन्या सन मराठी चॅनलवर प्रसारीत होणार्या सुंदरी मालिकेतील मुख्य भुमिकेतील अभिनेत्री आरती बिराजदार उपस्थितीत राहणार आहेत.
या कार्यक्रमात पुरस्कार रूपाने विविध क्षेत्रातील उल्लेखनिय कार्याबद्दल वेध परिवाराकडून सन्मान होणार असून जीवनगौरव पुरस्कार- श्री आण्णासाहेब खांडेकर,आरोग्यरत्न-डॉ.शरद शिर्के,
विशेष पोलिस अधिकारी-श्री रणजित माने, आदर्श प्राचार्य- श्री विश्वंभर काळे, कृषीरत्न-श्री राजाराम कालिबाग, आदर्श पत्रकार-शिवाजी पुजारी, आदर्श समाजसेवा-श्री श्रीकांत गणपाटील, उद्योगरत्न-श्री शिवाजी फटे,
युवा उद्योजक-श्री.विजय भोसले, आदर्श मुख्याध्यापक- श्री.प्रवीण गुंंड, आदर्श शिक्षक-श्री.एम.बी.जाधव, युवा भुषण-श्री.विश्वजीत बंडगर, आदर्श पशुधन विकास अधिकारी -डॉ रविंद्र बंडगर, पशुमित्र-श्री.सत्यवान यादव, आदर्श क्रिडा शिक्षक-श्री.आण्णा वाकडे,
आदर्श दुध उत्पादक-श्री.गणेश राजगे,समाजभूषण-श्री.किसन भजनावळे,आदर्श शिक्षक सेवा-श्री.मल्लेशा अरकेरी, आदर्श ग्रामसेवा-श्री.रविंद्र सोनवणे,
कलारत्न-श्री.कल्पेश कांबळे,आदर्श वैद्यकीय सेवा-श्री.वैभव स्वामी, आदर्श गाव – ग्रामपंचायत बोराळे,आदर्श सह पतसंस्था-सावित्रीबाई फुले पतसंस्था मरवडे, शिक्षण गंगोत्री-
सौ. सुजाता कोळी,आदर्श आरोग्य सेविका-रूपाली तिर्हेकर, आदर्श कोतवाल सेवा-श्री.इराण्णा कांबळे,आदर्श ग्रामपंचायत कर्मचारी संघटक-श्री.संतोष जामदार यांचा सन्मान होणार आहे.
या कार्यक्रमास विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील, आवताडे शुगरचे चेअरमन संजय आवताडे, रतनचंद शहा बँकेचे चेअरमन सुभाष शहा, प्रणिता भालके,दामाजी साखर कारखान्याचे चेअरमन शिवानंद पाटील,
व्हा.चेअरमन तानाजी खरात,युटोपीयन शुगरचे कार्यकारी संचालक रोहण परिचारक, खरेदी विक्री संघाचे चेअरमन सिध्देश्वर आवताडे,राष्ट्रवादीचे नेते लतिफभाई तांबोळी, माजी उपनगराध्यक्ष अजित जगताप,
वाघोली सुतगिरणीचे चेअरमन अभिजित ढोबळे, नगरसेवक प्रविण खवताडे,मार्केट कमिटीचे चेअरमन सोमनाथ आवताडे,होलार समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष ज्ञानदेव जावीर,राज्याचे अध्यक्ष नंदकुमार केंगार,
प्रसिध्द उद्योजक हणमंतराव दुधाळ,पत्रकार संघाचे संस्थापक दिगंबर भगरे, समाधान फुगारे, पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार,जेष्ठ पत्रकार मच्छिंद्र भोसले, यांच्यासह आदी मान्यवर कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.
प्रसिध्द वक्ते अविनाश भारती सरांचे मोलाचे व्यख्यान ऐकण्याची संधी समस्त मंगळवेढेकरांना वेध परिवाराने करून दिली आहे.
तरी मित्रपरिवार, हितचिंतक, वाचक,जाहीरातदार, नागरीकांनी या सदर कार्यक्रमास मोठया संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे पत्रकार विलास काळे यांनी प्रसिध्दीस बोलताना सांगितले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज