टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर शहरासाठी उजनी धरणातून पिण्यासाठी पाणी सोडण्यास सुरवात झाली आहे. आज सकाळी ६ वाजलेपासून हे पाणी सोडले जात आहे. सोलापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या औंज बंधाऱ्यात पाणी पोचल्यानंतर धरणातून सोडण्यात येणारे पाणी बंद करण्यात येणार आहे.
धरणातून सुरवातीला कमी प्रमाणात पाणी सोडण्यात येत आहे. हळूहळू भीमा नदीमध्ये सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहामध्ये वाढ करण्यात येणार आहे. धरणातून भीमा नदीमध्ये जवळपास सहा हजार क्युसेकने पाणी सोडले जाणार आहे. सोलापूर शहर, पंढरपूर, मंगळवेढा या शहराला पिण्यासाठी हे पाणी सोडण्यात आले आहे. जवळपास १०-१२ दिवसांनी हे पाणी आैज बंधाऱ्यात पोचण्याची शक्यता आहे.
उजनी धरणातून भीमा नदीमध्ये पाच टीएमसी एवढे पाणी सोडले जाणार आहे. नियोजनात ठरल्यानुसार हे पाणी भीमा नदीमध्ये सोडण्यात येत आहे. उजनी धरणाचा उपयुक्त पाणीसाठा वजामध्ये गेल्याने त्यातूनच आता पाण्याचा उपसा होणार आहे.
धरणातील उपयुक्त पाणीसाठा सध्या वजा १६ टक्याच्या पुढे गेला आहे. कालव्यातून व बोगद्यातूनही सध्या पाणी सोडले जात आहे. त्यातच आता भीमा नदीतूनही पाणी सोडण्यात येत असल्याने धरणातील उपयुक्त पाणीसाठा खूपच कमी होणार आहे.
Water released to Ulaji city for drinking from Ujani dam
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज