टीम मंगळवेढा टाईम्स ।
सोलापूर जिल्ह्यातील शेतक-यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. उजनी धरणातून शेतीसाठी पाणी सोडण्यात आले आहे. काल रात्रीपासून डाव्या कालव्यातून 500 क्युसेक पाणी सोडले गेले आहे.
सोलापूर शहरासाठी भीमा नदीतून पाणी सुरू असतानाच आता शेतीसाठी ही कालव्यातून पाणी सोडण्यात आले आहे.
हे पाणी 11 फेब्रुवारी पर्यंत सुरू राहणार आहे अशी माहिती प्रशासनाने दिली. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत काल कालवा सल्लागार समिती बैठक झाली.
त्यामध्ये पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शेतीसाठी पाणी सोडण्याची सूचना केली होती. त्यानुसार रात्री पासून डाव्या कालव्यातून पाणी सोडण्यात आले आहे. यावर्षी पाणी टंचाईची समस्या मोठ्या प्रमाणावर जाणवणार आहे.
सध्या उजनी धरणात 5.34 टीएमसी इतका उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. या हंगामातील शेतीसाठी शेवटचे आवर्तन आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज