टीम मंगळवेढा टाईम्स ।
कुर्डूवाडी येथील पशुधन विकास अधिकाऱ्याने कुर्डूवाडी येथील पशुवैद्यकीय दवाखान्यामध्येच कर्तव्यावर असताना स्वतच्या कार्यालयातीलच
छताच्या लाकडी वाश्याला एका दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सकाळी ९ ते दु ४ वाजण्याच्या दरम्यान घडली.
विश्वनाथ चिमाजी जगाडे (वय -३९,मूळ रा परभणी जिल्हा परभणी, सध्या कुर्डूवाडी ता.माढा)असे गळफास घेतलेल्या पशुधन विकास अधिकाऱ्याचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयत पशुधन विकास अधिकारी विश्वनाथ जगाडे हे मूळचे परभणी येथील असून कुर्डूवाडी येथे गेल्या दोन वर्षापासून पशुधन विभागात ते पशुधन विकास अधिकारी म्हणून कार्यरत होते.
घटनेची माहिती सायंकाळी मिळताच परिसरातील शासकीय व खासगी पशुवैद्य येथील ग्रामीण रूग्णालयात गर्दी केली होती.
गुरूवारी सकाळी सोलापुर जिल्हा परिषदेचे जिल्हा पशुधन विकास अधिकारी डॉ नवनाथ नरळे यांनी भेट देऊन कुटुंबाचे सांत्वन केले.
कुर्डूवाडी येथील ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदन करुन सदर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज