टीम मंगळवेढा टाईम्स।
बहुचर्चित म्हैसाळ योजनेचे पाणी तब्बल 21 वर्षांनंतर मंगळवेढा वितरिका क्रमांक दोनच्या कालव्याद्वारे आल्याने ऐन उन्हाळ्यात मारोळी, शिरनांदगी, चिक्कलगी, जंगलगी परिसरातील शेतकऱ्यांतून आनंद व्यक्त केला जात आहे. अक्षय्य तृतीया सणाच्या मुहूर्तावर म्हैसाळ योजनेचे पाणी आल्याने शेतकऱ्यांनी एकच जल्लोष केला.
दरम्यान आ.समाधान आवताडे व आ.प्रशांत परिचारक यांनी दाखल झालेल्या पाण्याचे पूजन केले आहे.
1999 च्या विधानसभा निवडणुकीत या योजनेचा शुभारंभ झाला. सहाव्या टप्प्यातून हे पाणी मंगळवेढा शिवारातील सहा हजार हेक्टरसाठी सोडण्याचे प्रस्तावित होते. 1999 पासून ते 2009 पर्यंत राज्यामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेस आघाडीचे सरकार होते.
परंतु या योजनेला 10 वर्षांत अपेक्षित गती मिळाली नाही. मतदारसंघ पुनर्रचेनंतर तत्कालीन आमदार भारत भालके यांनी या पाणी प्रश्नावर पाठपुरावा केला. दरम्यान 2014 मध्ये राज्यात व देशात राजकीय सत्तांतर झाले.
या योजनेचे पाणी तालुक्याला मिळावे म्हणून भारत भालके विधानसभेत सातत्याने माजी आमदार गणपतराव देशमुख यांच्या सोबतीने आवाज उठवत राहिले. त्यामुळे या योजनेसाठी पंतप्रधान सिंचन योजनेतून जवळपास दोन हजारपेक्षा अधिक कोटींची तरतूद करण्यात आल्यामुळे या कामाला गती मिळाली.
स्थानिक आमदार व शासन हे विरोधी असल्याने पाणी देण्याबाबत राजकीय श्रेयवाद झाल्याचा आरोप देखील झाला. कृष्णा नदीला आलेल्या पुरामुळे सांगलीला पूर परिस्थिती निर्माण होऊ नये, अतिरिक्त पाणी वाहून वाया जाण्यापेक्षा हे पाणी दुष्काळी भागाला देण्यासंदर्भात शासनाने प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला.
हे पाणी शिरनांदगी तलावात आले. दरम्यान, एका वेळी एका वितरिकेचे काम पूर्ण झाल्यामुळे हे पाणी सध्या कालव्यात सोडण्यात आले आहे. त्यामुळे महमदाबाद, मारोळी, शिरनांदगी, चिक्कलगी, जंगलगी, सलगर खु, सलगर बु, पौट, बावची या गावांतील 3860 हेक्टरपर्यंत हे पाणी चाचणीच्या निमित्ताने सोडण्यात आले. त्यामुळे भविष्यकाळात या भागातील शेतीला योजनेचे पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
गेल्या 21 वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या तालुक्याला अखेर म्हैसाळ योजनेसाठी दिवंगत आमदार भारत भालके यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे व शासनाने तरतूद केलेल्या निधीमुळे या योजनेचे पाणी तालुक्याला मिळाल्याने या भागातील शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पसरले आहे.
मंगळवेढा तालुक्यातील कायम दुष्काळी गावांना पाणी मिळावे म्हणून आपण सर्व तालुकासीयांनी पाण्यासाठी मोठा लढा उभा केला होता.
१९९२ -९३ पासून बंद असलेली ही म्हैसाळ योजना केंद्रीय वाहतूक दळणवळण भूपृष्टमंत्री नितीन गडकरी त्याचबरोबर तत्कालीन मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आग्रही भूमिका घेतली होती.
त्यांच्या माध्यमातून व सहकार्यातून पंतप्रधान कृषीसिंचन योजणेत राज्यातील एकूण सात प्रकल्पांचा समावेश करण्यात आला होता. त्या समाविष्ट यादीत आपल्या मंगळवेढा तालुक्यातील उपसा सिंचन योजणेचा समावेश करण्यात आला त्याअनुषंगाने सदरची योजणा कार्यान्वयीत होण्यासाठी मा.पंतप्रधान यांनी अंदाजे ३ हजार कोटी मंजूर केले होते.
ही योजणा केंद्राने दिलेल्या योजणेतून उभा रहात असून आज चाचणी स्तरावर पाणी सोडण्यात आले असून आज ही योजना मंगळवेढा तालुक्यात हरिक्रांती घडवून आणेल. याचेच फलीत म्हणून म्हैसाळ योजनेचे पाणी मंगळवेढा तालुक्याच्या दक्षिण भागात मारोळी व शिरनांदगीच्या हद्दीवर म्हशाळ योजणा वितरीका नंबर २ येथे दाखल झाले.
या दाखल झालेल्या पाण्याचे पुजन या मतदारसंघाचे विद्यमान आमदार समाधान आवताडे व विधानपरिषद सदस्य प्रशांत परिचारक यांच्या शुभहस्ते अक्षय तृतीयाच्या शुभ मुहूर्तावर श्रीफळ अर्पण करुन झाले.
यामध्ये पडोळकरवाडी , लोणार , महमदाबाद , हुन्नूर , शिरनांदगी , मारोळी , पौट , जंगलगी , सलगर खु.सलगर बु.लवंगी या गावांना या पाण्याचा फायदा होणार आहे . हे पाणी अक्षयपणाने तालुक्यास मिळावे तसेच तालुक्याच्या वाट्याचे पाणी अन्य कोठेही जाणार नाही , सदरचे पाणी कोणी अन्यत्र नेण्याचा प्रयत्न झाल्यास मोठा संघर्ष उभा करु असे प्रतिपादन यावेळी आमदार समाधान आवताडे यांनी केले.
यावेळी सदरची योजणा मार्गी लावल्याने ग्रामस्थांच्या चेह – यावर समाधान दिसून येत होते.
याप्रसंगी नागरिकांनी दोन्ही आमदार महोदयांचे अभिनंदन केले व उर्वरित गावांचाही पाणी प्रश्न मार्गी लावून मंगळवेढा तालुक्याचा दुष्काळी कलंक पुसून काढावा असे आवाहन उपस्थित जनतेने केले.
यावेळी संबंधीत अधिका – यांकडून आमदार समाधान आवताडे यांनी माहिती घेतली . याप्रसंगी माजी .जि.प.सदस्य शिवानंद पाटील , भाजपा ता.अध्यक्ष गौरीशंकर बुरकूल , भाजपा जिल्हा उपाध्यक्ष औदुंबर वाडदेकर , दिगंबर यादव , भारत गरंडे , नामदेव जानकर , अंकुश खताळ , पांडूरंग कांबळे , रमेश काशिद , शहाजी गायकवाड , बंडू गडदे , सुनिल पाटील , किसन पाटील , विजय पाटील , यशवंत खताळ , अशोक पाटील , संतोष बिराजदार , आबा खांडेकर , नारायण चौगुले , गौडाप्पा बिराजदार , संतोष कोकरे , दत्ता पाटील , राजू माने , भिमा तांबे , राजू सुतार तसेच परिसरातील शेतकरी उपस्थित होते.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज