परतणारा पाऊस पुन्हा एकदा जोरदार बरसणार अशी शक्यता आहे. बंगालच्या उपसागरावरील कमी दाबाच्या पट्ट्याची तीव्रता वाढल्याने दक्षिण कोकण आणि गोवा, दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कर्नाटकात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
मान्सून आता परतीच्या मार्गावर आहे. मात्र जाणारा हा पाऊस पुन्हा एकदा राज्याला झोडपण्याची शक्यता आहे. या आठवडाभर राज्यात मुसळधार ते अतीमुसळधार (Heavy to very heavy rains) पावसाचा इशारा वेधशाळेने (IMD Alert) या आधीही दिला होता.
17 ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रात कोकणसह आतल्या भागात पाऊस पूर्णपणे सक्रिय राहण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी मुसळधार ते अतीमुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली होती.
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचे आता तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रात रुपांतर झाले आहे. त्यामुळ सध्या पूर्व किनारपट्टीसह राज्यात सर्वत्र जोरदार पाऊस होत आहे. येत्या बुधवारी पुण्यासह मध्य महाराष्ट्रात तर गुरुवारी कोकणात मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
गेल्या २४ तासात कोकण, गोव्यातील लांजा १२०, राजापूर १००, देवगड, वैभववाडी ७०, दोडामार्ग, कणकवली, वेंगुर्ला ६० मिमी पावसाची नोंद झाली. मध्य महाराष्ट्रात जत १४०, विटा ९०, कडेगाव ८०, पंढरपूर, शेवगाव ७० मिमी पाऊस झाला. मराठवाड्यातील सेलू १२०, घनसावंगी, मंठा, परतूर ८०, कळमनुरी, शिरुर कासार ७० मिमी पाऊस झाला.
बंगालच्या उपसागरावरील कमी दाबाच्या पट्ट्याची तीव्रता वाढली
दक्षिण कोकण आणि गोवा, दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कर्नाटकात मुसळधार पावसाचा इशारा देण्यता आला आहे.@IMDWeather
????https://t.co/Ae6uryZW5q pic.twitter.com/xLLIjDvGB9
— PIB in Maharashtra ???????? (@PIBMumbai) October 12, 2020
विदर्भातील मंगळुरपीर ८०, दारव्हा ५० मिमी पावसाची नोंद झाली होती. याशिवाय राज्यात बहुतांश ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला आहे.
आजच्या पावसाचा अंदाज
१३ ऑक्टोबर रोजी दक्षिण कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोरदार तर विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.
१४ ऑक्टोबर रोजी मध्य महाराष्ट्रातील पुणे तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा इशारा आहे. विदर्भातही मुसळधार पावसाची शक्यता आहे.
१५ ऑक्टोबर रोजी कोकणातील सर्व जिल्ह्यात अति जोरदार पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा इशारा दिला आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज