मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । मंगळवेढा येथील राष्ट्रीय महामार्गावर क्रमांक १६६ चे काम दिलीप बिल्डकाॅन या कंपनीने रस्त्याचे काम वेगाने सुरु केले आहे. मात्र ज्यांच्या जमिनी संपादित केल्या त्यापैकी कित्येकांना नोटिसा नाहीत आणि अॅवार्डमध्ये नावे नाहीत तसेच आहे.
त्यांना देखील मोबदला देण्यास प्रांत कार्यालयाकडुन शेतकऱ्यांच्या जमिनीचा मोबदला देण्यास टाळाटाळ केली जात आहे त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहेत. मात्र संबंधित शेतकऱ्यांना व जय भवानी हाऊसिंग सोसायटीमधील सोळा कुटुंबे ही बेघर होण्याच्या मार्गावर आहेत.त्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे त्यासाठी त्या कुटुंबाचे पुनर्वसन करून त्यांना आर्थिक मोबदला ,घरे शासकीय जमिनी देऊन त्या ठिकाणी नागरिक सुविधाही उपलब्ध करून द्याव्यात.
या मागणीसाठी देशसेवा कामगार युनियन यांच्या माध्यमातून ६ मार्च २०२० रोजी सकाळी ११ वाजता मंगळवेढा प्रांत कार्यालयावर सामाजिक कार्यकर्ते आदित्य हिंदुस्तानी यांच्या नेतृत्वाखाली थालीनाद आंदोलन करण्यात येणार आहे याबाबतचे निवेदन निवासी जिल्हाधिकारी अजित देशमुख यांना देण्यात आले.यावेळी सामाजिक कार्यकर्ते आदित्य हिंदुस्तानी, चंद्रकांत पवार , विवेक खिल्लारे , किरण घोडके ,बापू पवार ,शयाम पवार, संतोष पवार, दादा पवार व महिला वर्ग उपस्थित होते.
न्याय न मिळाल्यास मुंबई हायकोर्टात न्याय मागण्यासाठी याचिका दाखल करण्यात येणार आहे : आदित्य हिंदुस्तानी
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज