टीम मंगळवेढा टाईम्स । अखिल भाविक वारकरी संप्रदाय मंडळच्या वतीने प्रांताधिकारी उदयसिंह भोसले व तहसीलदार स्वप्निल रावडे यांना बुधवार दि. 29 जुलै रोजी गोकुळ अष्टमीला सर्व मंदिर खुले करून कीर्तन, भजनाला परवानगी मिळावी यासाठी अखिल भाविक वारकरी संप्रदाय मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष ह,भ,प सुधाकर इंगळे महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली व अखिल भाविक वारकरी संप्रदाय मंडळचे सोलापूर जिल्हा सहअध्यक्ष ह.भ.प ज्ञानेश्वर भगरे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले.
दरम्यान रमजानला परवानगी मिळते तर गोकुळ अष्टमी साठी कीर्तन, भजनाला परवानगी का नाही. वारकरी परंपरेमध्ये गोकुळ अष्टमीला खूप मोठे महत्व असून ती निष्ठेने साजरी केली जाते. वारकरी भाविकांनी चैत्र वारी, रामनवमी, बीज, एकनाथ महाराज उत्सव, हनुमान जयंती, आषाढी वारी हे सर्व उत्सव घरात राहून साजरे केले.
महामारी कोरोना मुळे कुणीही शासन विरोधात भूमिका घेतली नाही. आंदोलन ही केले नाही, सहकार्यच केले.रमजान साजरा करणेसाठी परवानगी मिळते. बकरे कापण्यासाठी मंत्रालयात चर्चा, बैठका होतात. तर गोकुळ अष्टमीचा साधा विचार ही केला जात नाही. त्यासाठी निवेदन देऊन शासनाला जागे करावे लागते. हेच दुर्दैव आहे. गोकुळ अष्टमी हा परंपरेने केला जाणारा उत्सव आहे. प्रत्येक गावात हा कार्यक्रम केला जातो. ही अष्टमी नित्य नेमाने साजरी करणेसाठी लवकरात लवकर निर्णय करून जाहीर करावा.
तसेच सध्या बाजार पेठे सहित सर्व खुले केले आहे. त्यामुळे येणार्या गोकुळ अष्टमीला दि.05 ऑगस्ट ते 13 ऑगस्ट असे आठ दिवस श्री संत दामाजीपंत मंदीर तसेच मंगळवेढा तालुक्यातील व सोलापूर जिल्ह्यातील विविध गावामध्ये सप्ताह, नित्यनेम करणेसाठी गावा गावातील सर्व मंदिर खुले करून कीर्तन,भजन करणेसाठी नियम अटी घालून परवानगी जाहीर करावी अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल असे निवेदन ईमेल द्वारे मुख्यमंत्री यांना अखिल भाविक वारकरी संप्रदाय मंडळाच्या सर्व पदाधिकारी यांनी महाराष्ट्रभर देण्यात येणार आहे.
यावेळी तालुकाध्यक्ष ह.भ.प निलेश गुजरे, शहराध्यक्ष ह.भ.प गोपाळ कोकरे, तालुका उपाध्यक्ष ह.भ.प भिमराव पाटील, शहर उपाध्यक्ष ह.भ.प मल्लिकार्जुन राजमाने, शहर उपाध्यक्ष ह.भ.प मारूती भगत, शहर सचिव ह.भ.प अरूण बाबर, सहसचिव ह.भ.प रमेश माने, ह.भ.प अशोक घाडगे आदी उपस्थित होते.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज