टीम मंगळवेढा टाईम्स ।
पंढरपूर तालुक्यातील शेतकरी यांचा राजवाडा म्हणून नावलौकिक असलेल्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्यांने जानेवारी महिन्यात गळीतास गेलेल्या उसाचे बिल 90 दिवसांनंतर ही न दिल्याने सभासद शेतकऱ्याचा बेमुदत उपोषणाचा इशारा दिला.
पंढरपूर तालुक्यातील तिसंगी येथील शेतकरी उद्धव महिपती पाटील यांच्या मुलगा उत्कर्ष उद्धव पाटील यांच्या नावे विठ्ठल सहकारी साखर कारखान्यास दि.१४ जाने ते २० जानेवारी दरम्यान सुमारे ४२ टन ऊस गेला असून ३ महिन्यानंतरही ऊस बिल न मिळाल्याने उद्धव पाटील यांनी कारखाना प्रशासनास निवेदन दिले असून दि.६ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालय किंवा कारखाना स्थळावर बेमुदत उपोषण करणार असल्याचे इशारा दिला आहे.
शेतकऱ्यांना ऊस गळीतास गेल्यानंतर १४ दिवसात उसाचे पेमेंट अदा करण्याचा कायदा असून या कायद्याची पायमल्ली कारखान्याकडून झाले असून जानेवारीत महिन्यामध्ये गेलेल्या उसाचे बिल अद्याप शेतकऱ्यांना मिळाली नाही.
कारखाना स्थापनेनंतर मागील वर्षी संचालक मंडळाच्या निष्क्रिय कारभारामुळे बंद ठेवण्याची नामुष्की संचालक मंडळावर आली होती. तर यावर्षी राज्य सरकारकडून कारखान्यास कर्जास थकहमी मिळाल्यानंतर कारखाना सुरू करण्यात आला.
पंढरपूर! विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या सभासदाचे ऊस बिलासाठी बेमुदत उपोषण@Jayant_R_Patil @ChDadaPatil @bharanemamaNCP @AjitPawarSpeaks @PawarSpeaks @supriya_sule @RRPSpeaks @Dev_Fadnavis pic.twitter.com/6bsouJGMQ1
— Mangalwedha Times (@SamadhanFugare) April 4, 2021
90 दिवसापेक्षा जास्त दिवस झाले तरी शेतकऱ्यांच्या हातात पैसा येत नसल्याने सभासद शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरलीअसून उसाचे बिल सहा तारखेपर्यंत न मिळाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर किंवा विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर बेमुदत उपोषण करणार असल्याचे
व या उपोषण वेळी माझे जीवितास काही बरेवाईट झाल्यास याची सर्वस्वी जबाबदारी ही विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या प्रशासनाची राहील अशा आशयाचे निवेदन साखर आयुक्त जिल्हाधिकारी व कारखाना प्रशासन यांना उद्धव महिपती पाटील यांनी दिली आहे.
मागील काही दिवसांपूर्वीच साखर आयुक्त कार्यालयाकडून विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर आरआरसीची कारवाई करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना कळविण्यात आले आहे.
कारखान्याचे विद्यमान चेअरमन भगीरथ भालके हे पोटनिवडणुकीसाठी उमेदवार म्हणून शेतकऱ्यापुढे जात असताना त्यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे.
पवार साहेबांना बोलणार
जानेवारी महिन्यात गळीतास गेलेल्या उसाचे बिल 90 दिवसांनंतर ही न दिल्याने यासंदर्भात मी शरद पवार साहेबांना बोलून न्याय देण्याची मागणी करणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज