mangalwedhatimes.in
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

कोट्यावधी रुपयांची फसवणूक, विशाल फटेला ‘इतक्या’ दिवसाची पोलिस कोठडी; सरकारी वकील म्हणाले…

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
January 19, 2022
in क्राईम, राज्य
मंगळवेढ्याच्या तरुणाने केली कोट्यवधींची फसवणूक, गुन्हा दाखल; आकडा 200 कोटींच्या वर असल्याचा दावा!

टीम मंगळवेढा टाईम्स। 

मंगळवेढा बार्शीसह संपूर्ण महाराष्ट्रात बहुचर्चित ठरत असलेल्या बिगुबुल शेअर बाजार फसवणूक प्रकरणातील सूत्रधार विशाल फटे याला मंगळवारी बार्शी येथील जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले.

न्यायमूर्ती अजित कुमार भस्मे यांनी त्याला दहा दिवसांची दि.27 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी दिली. एकूणच फटेच्या सुरक्षेपासून ते त्याला लपवून फटेला गोपनीय पद्धतीने मागील दाराने न्यायालयात आणण्याच्या प्रकरणाची शहरात उलट-सुलट चर्चा सुरू होती.

विशाल फटे याने शेअर बाजारामध्ये गुंतवणूक केल्यास मी जास्त नफा मिळवून देतो, असे म्हणून लोकांना आपल्या जाळ्यात ओढले होते. त्यांच्याकडून कोट्यवधी रुपयांची रक्‍कम गुंतवणूक करून घेऊन ती रक्‍कम परत न देता फसवणूक केली होती.

गेल्या 9 जानेवारीपासून तो आऊट ऑफ कव्हरेज झाला होता. त्यामुळे गुंतवणूकदारांनी घाबरून त्याच्याविरोधात बार्शी शहर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता.

एकूण 81 तक्रारदारांनी केलेल्या तक्रारी करून 18 लाख 78 हजार रुपयांची फसवणूक झाल्याबाबत पोलीस ठाण्यामध्ये फटेसह इतर चौघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. त्यानुसार आर्थिक गुन्हे शाखेकडे तपास देण्यात आला होता.

पोलिस त्याचा शोध घेत असताना काल दि. 17 रोजी नाट्यमयरित्या फटे याने एक व्हिडिओ तयार करून तो त्याच्या अकाउंटवर टाकून झालेल्या प्रकाराबाबत माहिती दिली होती व जवळच्या पोलिस ठाण्यात हजर होतो, असे सांगितले होते.

यानंतर सोमवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास फटे हा सोलापूर येथील पोलिस अधीक्षक कार्यालयात हजर झाला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याची सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केली. तसेच त्याला सोलापूर येथे ठेवण्यात आले होते.

मंगळवारी विशाल फाटे याला बार्शी न्यायालयात हजर करण्यात येईल, असे जिल्हा पोलिस प्रमुखांनी सोलापूर येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले होते. मंगळवारी त्याला बार्शी न्यायालयात आणण्यासाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली होती.

फटे याला न्यायालयात आणले जाणार का? का व्हीसीच्या आधारे प्रकिया होणार याबाबतची माहिती खूपच गोपनीय पद्धतीने ठेवण्यात आली होती.

मात्र, अखेर पाच वाजून 12 मिनिटांनी विशालला सरकारी गाडीतून बार्शी न्यायालयात पाठीमागील दरवाजातून न्यायालयात आणण्यात आले. त्यावेळी त्याच्या समवेत पोलिसांचा मोठा फौजफाटा, पोलिस अधिकारी तैनात करण्यात आले होते.

बार्शी न्यायालयात सरकारी वकील अ‍ॅड प्रदीप बोचरे यांनी फटेच्या तिन्ही कंपनीचे मूळ कागदपत्रे हस्तगत करावयाचे आहेत, फिर्यादी व इतर गुंतवणूकदारांनी फटे याच्याकडे गुंतवणुकीसाठी दिलेली रक्कम त्याने कोण कोणत्या कंपनीत अथवा कोणत्या कोणत्या योजनेमध्ये कशा पद्धतीने गुंतवणूक केलेली आहे.

त्याबाबतचा कागदोपत्री पुरावा, इलेक्ट्रॉनिक्स पुरावे मिळवायचे आहेत, दिलेली रक्कम त्याने गुंतवणूक न करता ती रक्कम त्याने स्वतःच्या फायद्यासाठी वापरली असल्यास ती रक्कम इतर कोणाकडे दिली, याचा शोध घेऊन ती रक्कम हस्तगत करावयाची आहे,

नातेवाईक किंवा मित्राच्या नावे स्थावर-जंगम मालमत्ता खरेदी केलेली वगैरे आहे काय, रकमेची अन्य प्रकारे विल्हेवाट लावली आहे का, विशाल सह फिर्यादी व साक्षीदार यांची समोरासमोर रुजवात करून अपहारीत केलेली रक्कम त्याने कुठे ठेवली आहे,

याचा शोध घेणे, फटेला या गुन्ह्यामध्ये अन्य कोणी कोणी मदत केली आहे, तसेच त्यांनी स्थापन केलेल्या कंपनीचे सोलापूर जिल्हा बाहेरील कंपनी कार्यालयाच्या ठिकाणी त्याला सोबत घेऊन जाऊन तपास करावयाचा आहे,

बनावट कागदपत्राच्या आधारे स्थापन केलेले जे एम फायनान्स सर्विसेस कंपनी व त्या कंपनीचे एचडीएफसी पुणे या बँकेतील खात्याबाबत सखोल तपास करून पुरावा हस्तगत करायचा आहे,

तसेच अपहरण केलेली रक्कम कोणत्या बँकेत डिपॉझिट केले आहेे याबाबत चौकशी करणे आवश्यक आहे.त्यामुळे फटे याला पोलिस कोठडीची आवश्यकता आहे, असा युक्तिवाद सरकारी वकील अ‍ॅड प्रदिप बोचरे यांनी मांडला.

तक्रार दारांची संख्या वाढत असल्यामुळे व इतर अणेक बाबींचा तपास होण्यासाठी फटे याला 14 दिवसाची पोलिस कोठडी देण्यात यावी अशी मागणी सरकारी वकील अ‍ॅड प्रदिप बोचरे यांनी न्यायालयात केली होती.

ADVERTISEMENT

मात्र न्यायालयाने दहा दिवसांची पोलीस कोठडी मंजुर केली. विशाल फटे याचे वकिल अ‍ॅड विशालदिप जाधव (सांगोला) यांनी तो स्वतः पोलिसात हजर झाला आहे.फसवणूक प्रकरण हा तांत्रिक मुद्दा आहे असा युक्तिवाद केला.

 

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: विशाल फटे

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील ‘या’ शहरांमध्ये महिलांसाठी स्वतंत्र पोलीस स्टेशन उभारणार; गृहमंत्र्यांची घोषणा

लागा तयारीला! महाराष्ट्रात ७ हजार पदांवर पोलीस भरती प्रक्रिया; गृहमंत्री वळसे पाटलांकडून तारीख ‘जाहीर’

May 28, 2022
चमकदार कामगिरी! सोलापूर पोलिसांनी उध्वस्त केला बनावट नोटांची छपाई करणारा अड्डा

बनाव झाला उघड! नदीत ढकलून पत्नीचा खून; पतीला सुनावली जन्मठेपेची शिक्षा दहा हजार दंड

May 27, 2022
गाशा गुंडाळला! मंगळवेढ्यातील ‘या’ पतसंस्थेतील चौघा कर्मचाऱ्यांकडून 20 लाख 44 हजार 293 रुपयांचा अपहार

गाशा गुंडाळला! मंगळवेढ्यातील ‘या’ पतसंस्थेतील चौघा कर्मचाऱ्यांकडून 20 लाख 44 हजार 293 रुपयांचा अपहार

May 27, 2022
ठरलं तर मग! ऊर्जामंत्र्यांनी दिले संकेत महाराष्ट्रात ‘या’ ठिकाणी होणार लोडशेडिंग

दुर्घटना! शेतीपंप सुरू करताना अंगावर विजेची तार पडून मुलाचा मृत्यू; तारेच्या स्पर्शाने विजेचा धक्का बसून वडील जखमी

May 26, 2022
शिवसेना नेत्याची ईडीकडे तक्रार, सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ आमदाराची ईडीकडून चौकशी; जाणून घ्या नेमकं काय घडलं?

Breaking! शिवसेनेच्या ‘या’ बड्या मंत्र्याच्या घरासह 7 ठिकाणी ईडीची छापेमारी; गुन्हाही दाखल

May 26, 2022
पदवीधरसाठी रणधुमाळी शिगेला; देशमुख, ढमाले, पाटील व लाड यांच्यात काटे की टक्कर

मोठी बातमी! विधानपरिषदेच्या दहा जागांसाठी निवडणूक जाहीर; ‘या’ तारखेला मतदान असा असेल निवडणूक कार्यक्रम

May 26, 2022
संजय राऊत तुमचा हा सत्तेचा माज महाराष्ट्रातील…;संभाजीराजेंना उमेदवारी नाकारल्याने मराठा क्रांती मोर्चाचा इशारा

संजय राऊत तुमचा हा सत्तेचा माज महाराष्ट्रातील…;संभाजीराजेंना उमेदवारी नाकारल्याने मराठा क्रांती मोर्चाचा इशारा

May 25, 2022
संतापजनक! मंगळवेढ्यात जन्मदात्या आईनेच केला मुलीचा खून

मंगळवेढ्यातील नदी पात्रात महिलेचा विनयभंग करून जातीवाचक शिविगाळ; तिघांविरोधात गुन्हा दाखल

May 25, 2022
मंगळवेढ्यात ‘खून का बदला खून’ मधील तिघांची निर्दोष मुक्तता; वाचा सविस्तर बातमी

महिना दीड लाख पगार असलेल्या सोलापूरच्या दाम्पत्याचा दीड महिन्यात घटस्फोट; कारण वाचून थक्क व्हाल..

May 25, 2022
Next Post

मंगळवेढा तालुक्यातील 'ही' सोसायटी बिनविरोध; बबनराव आवताडे गटाचे वर्चस्व

ताज्या बातम्या

Transfer! मंगळवेढा पोलिस ठाण्याकडील ‘या’ पोलिस कर्मचार्‍यांच्या अन्यत्र बदल्या; नवीन ‘हे’ आले

Transfer! मंगळवेढा पोलिस ठाण्याकडील ‘या’ पोलिस कर्मचार्‍यांच्या अन्यत्र बदल्या; नवीन ‘हे’ आले

May 28, 2022
महाराष्ट्रातील ‘या’ शहरांमध्ये महिलांसाठी स्वतंत्र पोलीस स्टेशन उभारणार; गृहमंत्र्यांची घोषणा

लागा तयारीला! महाराष्ट्रात ७ हजार पदांवर पोलीस भरती प्रक्रिया; गृहमंत्री वळसे पाटलांकडून तारीख ‘जाहीर’

May 28, 2022
मंगळवेढ्यातून भरदिवसा मोटारसायकलची चोरी; घरफोडी, मोटारसायकल चोऱ्यांच्या प्रमाणात वाढ; ‘या’ ठिकाणी झाल्या चोऱ्या

घरफोडी! आईच्या उपचारासाठी ठेवलेले पावणेदोन लाख रुपये भावाच्याच मुलाने पळवले

May 27, 2022
चमकदार कामगिरी! सोलापूर पोलिसांनी उध्वस्त केला बनावट नोटांची छपाई करणारा अड्डा

बनाव झाला उघड! नदीत ढकलून पत्नीचा खून; पतीला सुनावली जन्मठेपेची शिक्षा दहा हजार दंड

May 27, 2022
मंगळवेढ्यातील ‘या’ गावात होणार नविन प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, ८ कोटींचा निधी मंजूर; आ.आवताडेंच्या पाठपुराव्याला यश

मंगळवेढा : 17 गावांची पाणी टंचाई होणार दूर, १० कोटींचा निधी मंजूर, आ.आवताडेंची माहिती; ‘या’ गावात कामालाही सुरुवात

May 27, 2022
गाशा गुंडाळला! मंगळवेढ्यातील ‘या’ पतसंस्थेतील चौघा कर्मचाऱ्यांकडून 20 लाख 44 हजार 293 रुपयांचा अपहार

गाशा गुंडाळला! मंगळवेढ्यातील ‘या’ पतसंस्थेतील चौघा कर्मचाऱ्यांकडून 20 लाख 44 हजार 293 रुपयांचा अपहार

May 27, 2022
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा