टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यातील माचणूर येथील मतदान केंद्रावर मोबाईल घेवून जाण्याची परवानगी नसताना अज्ञात व्यक्तीने मतदान करतानाचा फोटो कोणासही न कळता काढून सदरचा फोटो यु-टयूब माध्यमावर प्रसारीत करून निवडणूक आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरूध्द लोकप्रतिनिधीत्व अधिनियम कायदयाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, पंढरपूर मंगळवेढा २५२ या मतदार संघात विधानसभा पोटनिवडणूक मतदान असल्याने दि.१७ रोजी यातील फिर्यादी तथा माचणूरचे तलाठी विनोद बनसोडे हे कार्यालयात थांबून होते.
या दरम्यान दुपारी ३.३९ वा. एक व्हिडीओ सोशल मिडीयावर पाठविला होता. हा व्हिडीओ मतदान केंद्र बुथ क्र.२१३ मधील बॅलेट पेपर युनिट या मशिनवरील एका उमेदवाराचे चिन्हासमोर बटन दाबून मतदान केल्याचे १० सेकंदाचे व्हिडीओ चित्रण करून त्या व्यक्तीने यु-टयुबव्दारे माध्यमावर व्हायरल केल्याने आदर्श निवडणूक आचारसंहितेचा भंग झाला असल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.याचा अधिक तपास पोलिस करीत आहेत.
चहा पिताना पाकीट मारले
सोलापूर येथे टिळक चौकातील अनस हॉटेल येथे चहा पीत थांबले असताना गर्दीचा फायदा घेत पाच महिलांनी नजर चुकून पाकीट हाणले त्यात दीड हजार रुपये रोख रक्कम होती.
या घटनेची हकीकत अशी की, फिर्यादी रेणुका हनुमंत मंचले (वय -४० राहणार मोदी , जगजीवन राम झोपडपट्टी सोलापूर) या आपल्या पतीसह टिळक चौकात घरगुती सामान , भाजीपाला आणण्यासाठी गेले असताना टिळक चौक येथे आनस हॉटेल येथे चहा पिताना पाच महिलांनी गर्दीचा फायदा घेत त्यांच्या खिशातील पाकीट लंपास केले.
याबाबत फौजदार चावडी पोलिस ठाण्यात चंद्रकला नितीन कांबळे (वय -२५ ) दिपाली सुरेश सकट ( वय -२४ ) , ममता राजू लोंढे ( वय -२२ ) , वनमाला रेवन गायकवाड ( वय -४५ रा.सर्वजणी रामवाडी दवाखान्याच्या पाठीमागे , रामवाडी सोलापूर ) नंदा नागनाथ पात्रे ( वय -६ ९ रा.पारधी लिंमयेवाडी , सोलापूर ) या पाच जणींच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.घटनेचा अधिक तपास पोलीस कॉन्स्टेबल शेळके करीत आहेत .
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 99 70 76 6262 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 99 70 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
विश्वसनीय ऑनलाईन पोर्टल ‘मंगळवेढा टाईम्स’ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 75 88 214 814
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज