
टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा तालुक्यातील मारापूर ग्रामपंचायतीचे सरपंच विनायक यादव यांनी ‘एक तास गावासाठी’ हा उपक्रम राबविला असून, त्यातून स्वच्छतेवर जोर दिला.
या ग्रामपंचायतीची निवडणूक नुकतीच पार पडली असून, यामध्ये आमदार समाधान आवताडे समर्थक विनायक यादव यांचे वर्चस्व प्रस्थापित झाले.

आमदार आवताडे यांच्या प्रयत्नातून मोठ्या प्रमाणात विकास निधी मिळविला. त्यातून एक तास गावासाठी या संकल्पनेतून गावातील युवकांना एकत्र करून प्रत्येक रविवारी सकाळी आठ ते नऊ या वेळेत गावातील स्वच्छता करायची.
याची सुरवात गेल्या आठवड्यात झाली. या उपक्रमाबाबत परिसरातून कौतुक होत आहे. याचे नियोजन उपसरपंच अशोक आसबे, युवा नेते राजकुमार यादव, तुकाराम यादव, आनंदा पाटील,

युवा नेते बालाजी यादव, डॉ. सत्यवान यादव यांच्यावर सोपवले आहे. सरपंच विनायक यादव म्हणाले, गावाचा विकास करत असताना स्वच्छता, पाणी व रस्ते या तिन्हींची सांगड घालून गावगाडा पुढे न्यायचा आहे.

पुढील काळात गावाच्या विकासासाठी अनेक योजना राबविणार असून मारापूर गावाचे नाव राज्यात होईल असे काम करून दाखवणार असल्याचे त्यांनी सांगितले.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.




बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज











