टीम मंगळवेढा टाईम्स ।
संपूर्ण राज्यात एकाच वेळी घेतल्या गेलेल्या BDS म्हणजेच ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप या परीक्षेत मंगळवेढा शहरातील नगरपालिकेच्या न.पा.मुलांची शाळा नं.1 (बागेसमोरील) या शाळेतील
इयत्ता दुसरीतील चि.वर्धन सिद्धेश्वर निगडे – 86 गुण व चि. पृथ्वीराजसिंह अजितसिंह चव्हाण- 83 गुण मिळवून या दोन विद्यार्थ्यांनी ब्रॉन्झ मेडल जिंकून शाळेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे.
मुख्याध्यापिका श्रीमती. संगीता जावीर मॅडम म्हणाल्या की, मंगळवेढा ही अधिकाऱ्यांची खाण आहे. नगरपालिका शाळेतील विद्यार्थी भविष्यात मोठ्या अधिकारी पदापर्यंत पोहोचावेत अशा शुभेच्छा देऊन त्यांनी यशस्वीतांचे अभिनंदन केले.
याच परीक्षेत इयत्ता दुसरीतील चि. वेदांत गंगाराम भोसले – 75 गुण, कु.स्वरा दीपक कोकरे – 75 गुण,
चि.श्रीयोग गुरुराज बुरकूल – 74 गुण
चि.श्रीकृष्ण प्रसाद गजेंद्रगडकर – 73 गुण,
कु. आदिती सुशीलकुमार मोरे – 72 गुण
चि.समर्थ परेश खंकाळ – 69 गुण
चि. प्रवीण राजकुमार चौगुले – 69 गुण
कु.वेदिका सतीश घोडके – 67 गुण आणि
कु.प्राप्ती धनराज घुले – 55 गुण मिळवून सदर परीक्षेत यशस्वी झाले.
या विद्यार्थ्यांना वर्गशिक्षिका श्रीमती. सुनिता इराप्पा बागेवाडी मॅडम व वर्गशिक्षक श्री. यशवंत शरणप्पा वाघमोडे सर यांनी उत्कृष्ट असे मार्गदर्शन केले.
शालेय स्पर्धा परीक्षेत उत्कृष्ट निकालाची यशस्वी परंपरा शाळेने यावर्षी देखील कायम राखली आहे.
यावर्षी शाळेने विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेत बसण्याची सुवर्णसंधी निर्माण करून दिली होती. त्या प्रत्येक परीक्षेत शाळेतील विद्यार्थ्यांनी यश मिळवून शाळेचे नाव उज्ज्वल केले आहे.
त्याआगोदर घेतल्या गेलेल्या IAS अभिरूप सामान्य ज्ञान परीक्षेतही सर्व परीक्षार्थींनी उत्तम गुण मिळवून शाळेचा नावलौकिक वाढवला आहे.
अभिरूप परीक्षेत इयत्ता पहिली मधील कु. अभिज्ञा विलासराव देशमुख हिने 138 गुण मिळवून राज्यात सातवा क्रमांक पटकावला. तर कु. राजनंदिनी रणजीत चेळेकर हिने 120 गुण मिळवून केंद्रात सातवा क्रमांक पटकावला तसेच कु. कल्याणी राजेंद्र देवकर हिने 114 गुण मिळवून उत्कृष्ट यश संपादन केले.
इयत्ता पहिली मधील विद्यार्थ्यांना वर्गशिक्षिका सौ.वर्षा अनिल दत्तू आणि श्री. प्रशांत बालाजी कांबळे सर यांनी उत्कृष्ट मार्गदर्शन केले.
तर इयत्ता दुसरी मधून IAS अभिरूप सामान्य ज्ञान परीक्षा मध्ये चि. वर्धन सिद्धेश्वर निगडे -146 गुण मिळवून राज्यात तिसरा आला आहे. तर कु.वेदिका सतीश घोडके -134 गुण- राज्यात नववी,
चि. कृष्णा रविंद्र देवकर -132गुण – राज्यात दहावा, चि. समर्थ परेश खंकाळ – 132 गुण – राज्यात दहावा
चि.वेदांत गंगाराम भोसले – 128 गुण – केंद्रात नववा,
चि.पृथ्वीराजसिंह अजितसिंह चव्हाण – 128 गुण – केंद्रात नववा, चि. श्रीकृष्ण प्रसाद गजेंद्रगडकर – 128 गुण – केंद्रात नववा, कु. आदिती सुशीलकुमार मोरे – 128 गुण – केंद्रात नववी हे सर्व विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकले आहेत.
तर कु. स्वरा दीपक कोकरे – 126 गुण,
कु. आदिती गणेश कदम – 116 गुण
कु. अनन्या राहुल रत्नपारखी – 114 गुण
चि. श्रीयोग गुरुराज बुरकुल- 112 गुण
चि. प्रवीण राजकुमार चौगुले – 92 गुण
मिळवून वरील परीक्षेत यशस्वी झाले.
या शाळेचे आगळेवेगळे वैशिष्ट्य म्हणजे स्पर्धा परीक्षेबरोबरच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी शाळेत चित्रकला , सुंदर हस्ताक्षर लेखन ,वक्तृत्व स्पर्धा, मैदानी स्पर्धा, वनभोजन, ऑनलाईन टेस्ट, सहल ,संचलन , नृत्य यासारखे वेगवेगळे नवनवीन उपक्रम कायम राबवले जातात .
शालेय स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थ्यांचे यशस्वी होण्याचे प्रमाण पाहता इयत्ता पहिली ते चौथी मध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थी व पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद शाळेला मिळत आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज