टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यातील लवंगी येथे बचत गटाच्या हप्त्याचे पैसे भरून घराकडे परत जाणाऱ्या एका ३५ वर्षीय विवाहित महिलेचा विनयभंग केल्याची घटना घडली असून
याप्रकरणी सचिन बाबासाहेब कांबळे याच्याविरूध्द सदर पिडीतेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, यातील ३५ वर्षीय विवाहित महिला ही दि.३ मार्च रोजी सकाळी ११.०० वा . लवंगी येथील धनश्री बँकेच्या बचत गटाच्या हप्त्याचे पैसे वसुलीकरीता बचत गटाच्या घरी जावून
परत येत सदस्याच्या असताना रस्त्यामध्ये आरोपीने तु मला फार आवडतेस असे म्हणून तीच्या मनाला लज्जा वाटेल असे कृत्य केल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले असून
सदर आरोपीने पिडीतेचा मुलगा याच्याशीही धक्काबुक्की करून शिवीगाळ केल्याचे म्हटले आहे. याचा अधिक तपास पोलिस हवालदार दत्तात्रय येलपले हे करीत आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज