मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
जालन्यातील भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव कोलते ग्रामपंचायत ग्रामस्थांवर अक्षरशः गाव विकण्याची वेळ आहे. गावात वेगवेगळ्या ठिकाणी गाव विकण्या संदर्भात बॅनर, पोस्टर सगळीकडे लावले आहेत. ग्रामस्थांनी एवढं टोकाचं पाऊल का उचलावं लागलं अशी चर्चा सगळीकडे होत आहे.
जालन्यातील कोलते ग्रामपंचायत ग्रामस्थासह माजी ग्रामपंचायत सदस्यांनी विक्रीला काढली आहे. गावकऱ्यांनी ”पिंपळगाव कोलते ग्रामपंचायत विकणे आहे’ अशा आशयाचे पोस्टर गावात लावले आहेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
सरपंच, उपसरपंच हे गावात विहीर आणि घरकुल वाटप करतांना भ्रष्टाचार करत आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या कारभाराला वैतागलेल्या गावकऱ्यांनी संपूर्ण गावात ग्रामपंचायत विक्रीला असल्याचे बॅनर सगळीकडे लावले आहेत.
दरम्यान पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी याची दखल घ्यावी अन्यथा ग्रामस्थ सामूहिक आत्मदहन करण्याच्या तयारीत असल्याचा ईशारा माजी उपसरपंचांनी दिला आहे.
एवढंच नव्हे पुढे ते म्हणाले की, जर यामध्ये बदल झाला नाही तर गावकरी आत्मदहन करण्याचा इशारा देखील दिला आहे.
महाराष्ट्रात कुठे घडलाय हा प्रकार?
या अगोदर राज्यातील बीड जिल्ह्यातील ग्रामस्थांनी गाव विक्रीला काढले होते. बीडमधील पाटोदा तालुक्यातील खडकवाडी गाव विक्रीसाठी काढले होते. या गावात 1800 ग्रामस्थ राहतात. कारण या गावाचा विकास केवळ कागदावरच झाला आहे.
ज्या प्रमाणे ‘जाऊ तिथे खाऊ’ चित्रपटात विहीर केवळ कागदावरच झाली होती, त्या प्रमाणे गावाचा विकास कागदावर करण्यात आला आहे. विकासासाठी आलेला निधीतून गावातील प्रमुख आणि इतर अधिकाऱ्यांनी आपले खिसे भरल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात आला होता.(स्रोत:सामtv)
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज