मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
लाडकी बहीण योजनेत महिलांच्या अर्जांची पडताळणी सुरु झाली आहे. लाडकी बहीण योजनेत महिला आता फेब्रुवारीच्या हप्त्याची वाट बघत आहेत. फेब्रुवारीचा हप्ता कधी येणार याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.
फेब्रुवारीचा हप्ता येण्यास उशीर होण्याची शक्यता आहे. कदाचित फेब्रुवारी महिन्यात महिलांना १५०० रुपये मिळणार देखील नाहीत. याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
लाडकी बहीण योजनेत महिलांना पडताळणी केली जात आहे. पाच टप्प्यांमध्ये ही पडताळणी केली जाणार आहे. चारचाकी वाहन असलेल्या महिलांची सध्या तपासणी सुरु आहे.
ही पडताळणी होण्यासाठी अजून आठ-दहा दिवस लागण्याची शक्यता आहे.यानंतर त्याचा अहवाल शासनाला पाठवला जाईल. त्यानंतर निर्णय घेतला जाईल.
पडताळणी झाल्यानंतर १५०० रुपये दिले जातील. त्यासाठी मार्च महिना उजाडेल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र, या योजनेच्या हप्त्याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत साडेपाच लाख महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत. यामध्ये काही महिला आधीच इतर योजनांचा लाभ घेत आहेत. काही महिलांकडे चारचाकी वाहने आहेत.
तर काही महिला २१ ते ६५ या वयोगटात बसत नाही. त्यामुळे त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. या योजनेच्या अर्जांची पडताळणी सुरु आहे. पडताळणी पूर्ण झाल्यानंतरच तुम्हाला पैसे मिळणार आहेत.
लाडकी बहीण योजनेत महिलांची पाच टप्प्यांमध्ये पडताळणी केली जाणार आहे. त्यात पहिला टप्प्यात चारचाकी वाहने असणाऱ्या महिलांची पडताळणी करणार आहे. त्यानंतर उत्पन्न, वयोगट या गोष्टींचा पडताळणी करणार आहे. या योजनेतून अजून अनेक महिला बाद होण्याची शक्यता आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज