mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

वीरशैव लिंगायत संकल्प सभा आज मंगळवेढ्यात; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत होणार; संत बसवेश्वर, संत चोखामेळा स्मारकासंदर्भात निर्णय होण्याची शक्यता?

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 7, 2024
in मंगळवेढा, सोलापूर
बसवेश्वर स्मारकासाठी निधी देण्याचे दिले आश्वासन; अर्थसंकल्पात कोणतीच निधीची तरतूद केली नाही

टीम मंगळवेढा टाईम्स ।

वीरशैव लिंगायत संकल्प सभा आज मंगळवेढा येथे सायंकाळी चार वाजता काशी विश्वेश्वर संस्कृतीक मैदान मंगळवेढा येथे आयोजित करण्यात आली असून

या संकल्प सभेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार असल्याची माहिती राज्य सभेचे खासदार अजित गोपचाडे यांनी दिली आहे.

या सभेसाठी श्रीशैल्य हत्तुरे, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार समाधान आवताडे, आमदार अभिमन्यू पवार, आमदार बसवराज पाटील मुरूम कर,

आमदार अर्चनाताई पाटील चाकूरकर, बी एस पाटील, सुमित मोरगे , गोविंद माकणे, गजानन धरणे, नितीन शेटे, श्रावण जंगम, शिवानंद पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

दरम्यान, या संकल्प सभेमध्ये संत बसवेश्वर महाराज व संत चोखामेळा जागा व स्मारक या संदर्भात घोषणा होण्याची शक्यता आहे.

त्यामुळे घोषणा झाल्यानंतर बऱ्याच वर्षापासून प्रलंबित असलेला मोठा प्रश्न मार्गी लागला जाऊ शकतो.

मोठी बातमी! युवकांना प्रत्येक महिन्याला मिळणार 5000 रुपये, काय आहे योजना? कसा कराल अर्ज?

भारत सरकारने तरुणांसाठी इंटर्नशिप योजना सुरू केली आहे. पीएम इंटर्नशिप योजना  असं या योजनेचं नाव आहे. हा सरकारचा एक प्रकारचा पायलट प्रोजेक्ट आहे.

3 ऑक्टोबरला ही योजना सुरु करण्यात आली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2024-25 च्या अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा केली होती. दरम्यान, काय आहे पीएम इंटर्नशिप योजना? यामध्ये कोण अर्ज करू शकतो? ही योजना कधी सुरू होत आहे? जाणून घेऊयात याबाबतची सविस्तर माहिती.

पीएम इंटर्नशिप योजनेअंतर्गत 5 वर्षांत देशातील सुमारे 1 कोटी तरुणांना कंपन्यांमध्ये इंटर्नशिप दिली जाणार आहे. या योजनेत इंटर्नला दरमहा 5,000 रुपये दिले जातील. त्यापैकी 4500 रुपये भारत सरकार आणि 500 ​​रुपये इंटर्नशिप देणारी कंपनी देईल.

या योजनेअंतर्गत निवडलेल्या उमेदवारांची यादी 26 ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करता येणार आहे. 27 नोव्हेंबरपर्यंत कंपन्या अंतिम निवड करतील आणि 2 डिसेंबर 2024 पासून 12 महिन्यांसाठी इंटर्नशिप सुरू होईल.

पीएम इंटर्नशिप योजनेअंतर्गत तरुणांना भारतातील टॉप 500 कंपन्यांमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळेल. पाच वर्षांच्या कालावधीत 1 कोटी तरुणांना इंटर्नशिपच्या संधी उपलब्ध करून देणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे.

सुरुवातीला इंटर्नशिपमध्ये सहभागी होण्यासाठी 6,000 रुपये एकरकमी आर्थिक सहाय्य दिले जाईल. त्यानंतर एक वर्षासाठी प्रत्येक महिन्याला 5,000 रुपये आर्थिक सहाय्य दिले जाईल. इंटर्नशिप 12 महिन्यांसाठी असेल. चालू आर्थिक वर्षात 1.25 लाख इंटर्नशिप संधी उपलब्ध करून देण्याची योजना असल्याची माहिती सरकारी सूत्रांनी सांगितली आहे. यासाठी 800 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

बऱ्याच कंपन्यांनी या योजनेत स्वारस्य दाखवण्यास सुरुवात केली आहे. काही दिवसांपूर्वी प्रवास बुकिंग प्लॅटफॉर्म EaseMyTrip ने घोषणा केली होती की ते पुढील 3-6 महिन्यांत भारतभरातील 500 कंपन्यांना नियुक्त करणार आहेत.

10 ऑक्टोबरपर्यंत कंपन्या त्यांच्या गरजा आणि इंटर्नशिप पोस्ट्सची माहिती देतील. इच्छुक तरुण 12 ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून www.pminternship.mca.gov.in या पोर्टलवर नोंदणी करु शकतील. शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांची यादी 26 ऑक्टोबरपर्यंत कंपन्यांना दिली जाईल.

हे पोर्टल प्रायोगिक तत्त्वावर नुकतेच सुरु करण्यात आले असले तरी, इंटर्नच्या अर्जासाठी पोर्टल उघडण्यासाठी सरकारने विजयादशमीचा शुभ दिवस निवडला आहे. आतापर्यंत 111 कंपन्या यात सामील झाल्या असून यामध्ये महाराष्ट्र, उत्तराखंड, तेलंगणा आणि गुजरात राज्यांचा समावेश आहे.

पीएम इंटर्नशिप योजनेचा लाभ घेण्यासाठी उमेदवाराची वयोमर्यादा 21 ते 24 वर्षे निश्चित करण्यात आली आहे. याशिवाय कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 8 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे. सध्या औपचारिक पदवी अभ्यासक्रम किंवा नोकरी करणाऱ्यांना योजनेचा लाभ दिला जाणार नाही. तथापि, असे उमेदवार ऑनलाइन अभ्यासक्रम किंवा व्यावसायिक प्रशिक्षणाचा भाग बनू शकतात.

दरम्यान, निवडलेल्या उमेदवारांची यादी 26 ऑक्टोबरपर्यंत उपलब्ध असेल. कंपन्या 27 नोव्हेंबरपर्यंत अंतिम निवड करतील आणि इंटर्नशिप 2 डिसेंबर 2024 पासून 12 महिन्यांसाठी सुरू होईल.

इंटर्नशिपसाठी निवडलेल्या तरुणांना प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत विमा संरक्षण दिले जाईल. सरकार यासाठी प्रीमियम भरेल याशिवाय कंपन्या निवडलेल्या उमेदवाराला अतिरिक्त अपघात विमा देऊ शकतात.

राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 99 70 76 6262 हा आमचा नंबर.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 99 70 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

विश्वसनीय ऑनलाईन पोर्टल ‘मंगळवेढा टाईम्स’ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 75 88 214 814

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: वीरशैव लिंगायत संकल्प सभा

संबंधित बातम्या

जनता संभ्रमात! भगीरथ भालकेंचे नेमकं चाललंय तरी काय, दोन दिवसात दोन वेगवेगळ्या पक्षाकडून भरले अर्ज; पंढरपूर-मंगळवेढ्याच्या जागेबाबत सस्पेन्स आणखी वाढला?

भगीरथदादा आता प्रवास पुरे! ‘पक्षांतराचा प्रवास आता थांबवा’; सिद्धाराम म्हेत्रेंचा भगीरथ भालकेंना रोखठोक सल्ला

April 13, 2026
दुर्दैवी घटना! सांगोल्यातील ‘या’ गावात दोन बहिणींचा शेततळ्यात बुडून मृत्यू

काळीज पिळवटून टाकणारी घटना! शेततळ्यात बुडून बहीण-भावाचा अंत; आजीसमोरच काळाचा घाला; सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना

April 13, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

मंगळवेढेकरांची प्रतीक्षा आता संपणार ! महात्मा बसवेश्वर स्मारकाची जागा निश्चित; निधी कमी पडू देणार नाही; आमदार समाधान आवताडेंची ग्वाही

April 13, 2026
Breaking! मंगळवेढ्याच्या दोन ‘नायब तहसीलदारां’ची तहसीलदार पदावर पदोन्नती

संतापजनक! घरजागा नावावर करण्यास नकार; पोटच्या मुलानेच वृद्ध आईला घराबाहेर हाकलले; न्यायासाठी वृद्धेची पोलिस अधीक्षकांकडे धाव

April 12, 2026
न्यूरोसर्जन डॉ.शिरीष वळसंगकर प्रकरणाला वेगळं वळण; आरोपी महिलेच्या वकिलाचा मोठा खुलासा

बापरे..! सोलापुरातील वकिलास जीएसटीची १२१ कोटी दंडाची नोटीस; काय आहे नेमके प्रकरण?

April 12, 2026
सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गावाची निवड, १० लाख रुपयांचे बक्षीस; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा होणार सन्मान

Breaking! मंगळवेढ्यात शासकीय नियमांची ऐशीतैशी; दालनात वाढदिवस साजरा करणे पडणार महागात; गटविकास अधिकारी यांचा अहवाल सादर करण्याचे पुण्यातून फर्मान

April 12, 2026
तगडा उमेदवार! पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा; भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत निवडणूक लढवणार?

अनिल सावंत ‘स्वगृही’ तर भालके ‘नाथांच्या’ चरणी; मंगळवेढा-पंढरपूरच्या राजकारणात ‘विठ्ठल’ कोणाला पावणार?

April 12, 2026
प्रियकराच्या सांगण्यावरूनच जन्मदात्या आईने 9 महिन्याच्या बाळाचा गळा घोटला

मोठी बातमी! मंगळवेढ्यात सख्खा भाऊच बनला ‘यमदूत’; कुऱ्हाडीच्या एका वाराने होत्याचे नव्हते झाले; खुनामागचं खरं कारण वाचून अंगावर येईल काटा

April 11, 2026
एकाच छताखाली २५ स्टॉल्स, सेवांचा पाऊस; एकाच दिवशी तब्बल ‘इतके’ हजार लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य उमटले; पाटकळ महसूल विभागात विक्रमी कामकाज

एकाच छताखाली २५ स्टॉल्स, सेवांचा पाऊस; एकाच दिवशी तब्बल ‘इतके’ हजार लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य उमटले; पाटकळ महसूल विभागात विक्रमी कामकाज

April 11, 2026
Next Post
मोठी बातमी! राज्यातील प्राथमिक शाळांच्या वेळेत होणार बदल, आता ‘या’ वेळेत भरणार चौथीपर्यंतचे वर्ग; सर्व शाळांना नियम लागू

सुरक्षेला प्राधान्य! गावातील प्रत्येक विद्यार्थ्याची काळजी; चारशे शाळांमध्ये बसणार 'सीसीटीव्ही'; जिल्हा परिषद शिक्षण विभागाने उचलले पाऊल

ताज्या बातम्या

जनता संभ्रमात! भगीरथ भालकेंचे नेमकं चाललंय तरी काय, दोन दिवसात दोन वेगवेगळ्या पक्षाकडून भरले अर्ज; पंढरपूर-मंगळवेढ्याच्या जागेबाबत सस्पेन्स आणखी वाढला?

भगीरथदादा आता प्रवास पुरे! ‘पक्षांतराचा प्रवास आता थांबवा’; सिद्धाराम म्हेत्रेंचा भगीरथ भालकेंना रोखठोक सल्ला

April 13, 2026
दुर्दैवी घटना! सांगोल्यातील ‘या’ गावात दोन बहिणींचा शेततळ्यात बुडून मृत्यू

काळीज पिळवटून टाकणारी घटना! शेततळ्यात बुडून बहीण-भावाचा अंत; आजीसमोरच काळाचा घाला; सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना

April 13, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

मंगळवेढेकरांची प्रतीक्षा आता संपणार ! महात्मा बसवेश्वर स्मारकाची जागा निश्चित; निधी कमी पडू देणार नाही; आमदार समाधान आवताडेंची ग्वाही

April 13, 2026
Breaking! मंगळवेढ्याच्या दोन ‘नायब तहसीलदारां’ची तहसीलदार पदावर पदोन्नती

संतापजनक! घरजागा नावावर करण्यास नकार; पोटच्या मुलानेच वृद्ध आईला घराबाहेर हाकलले; न्यायासाठी वृद्धेची पोलिस अधीक्षकांकडे धाव

April 12, 2026
न्यूरोसर्जन डॉ.शिरीष वळसंगकर प्रकरणाला वेगळं वळण; आरोपी महिलेच्या वकिलाचा मोठा खुलासा

बापरे..! सोलापुरातील वकिलास जीएसटीची १२१ कोटी दंडाची नोटीस; काय आहे नेमके प्रकरण?

April 12, 2026
सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गावाची निवड, १० लाख रुपयांचे बक्षीस; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा होणार सन्मान

Breaking! मंगळवेढ्यात शासकीय नियमांची ऐशीतैशी; दालनात वाढदिवस साजरा करणे पडणार महागात; गटविकास अधिकारी यांचा अहवाल सादर करण्याचे पुण्यातून फर्मान

April 12, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..