टीम मंगळवेढा टाईम्स ।
भोसरी येथील ११ महिन्यांच्या वेदिका सौरभ शिंदे हिला स्पायनल मस्क्युलर ॲट्रॉफी टाईप-वन हा दुर्मिळ आजार झाला होता. त्यावरील उपचारासाठी तिला पुण्यातील खासगी रुग्णालयात ‘झोलगेन्स्मा’ हे १६ कोटी रुपयांचे इंजेक्शन दीड महिन्यांपूर्वी दिले होते. रविवारी सायंकाळी तिचे निधन झाले.
वेदिकाच्या उपचारासाठी लोकवर्गणीतून निधी उभारला होता. अमेरिकेतून इंजेक्शन मागविले होते.
त्यावरील सहा कोटी रुपयांचे आयात शुल्क केंद्र सरकारने माफ केले होते. पंधरा जून रोजी वेदिकाला इंजेक्शन दिले होते.
तेव्हा पासून तिच्या प्रकृतीत सुधारणा झाली होती. मात्र, रविवारी सायंकाळी खेळत असताना तिला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. तिला तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल केले. पण, सहाच्या सुमारास तिचे निधन झाले
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज