mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

वेदांता-फॉक्सकॉनचा संलग्न प्रकल्प महाराष्ट्रात; देवेंद्र फडणवीसांनी आभार मानत विरोधकांना टोला लगावला

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
September 15, 2022
in राजकारण, राज्य
Breaking! देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीसाठी राजभवनावर दाखल, सत्ता स्थापनेसाठी जोरदार हालचाली; ‘ही’ मागणी केली जाणार

टीम मंगळवेढा टाईम्स ।

वेदांता-फॉक्सकॉनचा दीड लाख कोटींचा प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे महाराष्ट्रात राजकीय वातावरण पेटलं आहे. या प्रकल्पामुळे राज्यातील १ लाख नोकऱ्या बुडाल्या असा आरोप विरोधकांकडून करत सत्ताधाऱ्यांची कोंडी निर्माण करण्याचा प्रयत्न झाला.

परंतु, याच आरोप-प्रत्यारोपात वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांनी वेदांता-फॉक्सकॉनचा संलग्न प्रकल्प महाराष्ट्रात उभारणार असल्याची मोठी घोषणा केली आहे. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेदांताचे आभार मानत विरोधकांना टोला लगावला आहे.

काय म्हणाले अनिल अग्रवाल?

वेदांता-फॉक्सकॉन बहु-अब्ज डॉलरच्या गुंतवणुकीसाठी व्यावसायिकरित्या साइटचे मूल्यांकन करत आहे. ही एक वैज्ञानिक आणि आर्थिक प्रक्रिया आहे ज्याला अनेक वर्षे लागतात.

आम्ही याची सुरुवात सुमारे २ वर्षांपूर्वी केली होती. आमचा उद्देश साध्य करण्यासाठी आमच्या अंतर्गत आणि बाह्य व्यावसायिक एजन्सीच्या टीमने काही राज्ये

उदा. गुजरात, कर्नाटक, महाराष्ट्र, तामिळनाडू इ. गेल्या २ वर्षांपासून आम्ही या प्रत्येक सरकारशी तसेच केंद्र सरकारशी चर्चा करत आहोत आणि आम्हाला त्यांचा चांगला पाठिंबा मिळाला आहे.

काही महिन्यांपूर्वी आमच्या अपेक्षा पूर्ण केल्यामुळे हा प्रकल्प गुजरातला घेण्याचा निर्णय घेतला. पण जुलैमध्ये महाराष्ट्राच्या नेतृत्वासोबत झालेल्या बैठकीत त्यांनी स्पर्धात्मक ऑफरसह इतर राज्यांना मागे टाकण्याचा प्रचंड प्रयत्न केला.

परंतु आम्हाला एकाच ठिकाणी सुरुवात करायची आहे असल्यानं व्यावसायिक आणि स्वतंत्र सल्ल्यानुसार आम्ही गुजरातची निवड केली. ही अब्जावधी डॉलरची दीर्घकालीन गुंतवणूक भारतीय इलेक्ट्रॉनिक्सची दिशा बदलेल.

आम्ही संपूर्ण भारतात इकोसिस्टम तयार करू आणि महाराष्ट्रातही गुंतवणूक करण्यासाठी आम्ही पूर्णपणे वचनबद्ध आहोत.

आमच्या गुजरात JV मध्ये एकीकरण पुढे नेण्यासाठी महाराष्ट्र आमची गुरुकिल्ली असेल असं सांगत त्यांनी वेदांता-फॉक्सकॉनचा संलग्न प्रकल्प महाराष्ट्रात उभारणार असल्याचे स्पष्ट म्हटलं.

देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना टोला

कंपनीच्या या निर्णयावर प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत सांगितले की, वेदांता-फॉक्सकॉनच्या संलग्न प्रकल्पासाठी महाराष्ट्राची निवड करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल मी अनिल अग्रवाल यांचे मनःपूर्वक आभार मानतो.

महाराष्ट्रात गुंतवणूक यावी यासाठी आम्ही कायमच स्पर्धात्मक आणि व्यवसायपूरक राहू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मात्र मला खेद होतो की केवळ राजकीय स्वार्थीपणासाठी अतिशय चुकीचे, नकारात्मक आणि निराधार दावे केले जात आहेत. पण असे करून ते केवळ त्यांच्या अकार्यक्षमतेचेच प्रदर्शन करीत आहेत.

महाराष्ट्रात ३.५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक रिफायनरीच्या माध्यमातून येत असताना त्याला विरोध कुणी केला, हा प्रकल्प कुणी लांबविला? हा माझा या नेत्यांना प्रश्न आहे.

स्वतः कार्यक्षम होण्यावर आधी लक्ष केंद्रीत करा, ना की अस्वस्थता आणि नकारात्मकतेवर असं सांगत फडणवीसांनी विरोधकांना जोरदार टोला लगावला.(स्त्रोत:लोकमत)

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: देवेंद्र फडणवीस

संबंधित बातम्या

न्यूरोसर्जन डॉ.शिरीष वळसंगकर प्रकरणाला वेगळं वळण; आरोपी महिलेच्या वकिलाचा मोठा खुलासा

बापरे..! सोलापुरातील वकिलास जीएसटीची १२१ कोटी दंडाची नोटीस; काय आहे नेमके प्रकरण?

April 12, 2026
तगडा उमेदवार! पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा; भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत निवडणूक लढवणार?

अनिल सावंत ‘स्वगृही’ तर भालके ‘नाथांच्या’ चरणी; मंगळवेढा-पंढरपूरच्या राजकारणात ‘विठ्ठल’ कोणाला पावणार?

April 12, 2026
तगडा उमेदवार! पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा; भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत निवडणूक लढवणार?

मंगळवेढ्यात राजकीय धमाका! अनिल सावंतांचे ‘शिवबंधन’; कार्यकर्त्यांच्या अनेक वर्षांच्या इच्छेची पूर्ती होणार

April 10, 2026
शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा; पोलीस संरक्षणासह ‘ही’ फी बंद करणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

कामाची बातमी! ‘या’ परवानग्यांचे अधिकार आता थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा मोठा निर्णय

April 9, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

सोलापूर जिल्हात ‘या’ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीचा शंखनाद; आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; असा आहे निवडणूक कार्यक्रम..

April 7, 2026
बाबो..! अशोक खरातच्या मोबाइलमधील डेटा पाहून पोलीसही चक्रावले, धक्कादायक माहिती समोर; पुन्हा गूढ वाढले

मोठी बातमी! भोंदूबाबाचा पाय आणखी खोलात; अशोक खरात विरोधात ‘हा’ गुन्हा दाखल

April 6, 2026
जनता संभ्रमात! भगीरथ भालकेंचे नेमकं चाललंय तरी काय, दोन दिवसात दोन वेगवेगळ्या पक्षाकडून भरले अर्ज; पंढरपूर-मंगळवेढ्याच्या जागेबाबत सस्पेन्स आणखी वाढला?

जनता संभ्रमात! भगीरथदादा, तुमची निष्ठा नेमकी कुणाकडे? ​बीआरएस, काँग्रेस, राष्ट्रवादी अन् आता शिवसेना; भालकेंच्या वारंवार बदलणाऱ्या भूमिकांमुळे कार्यकर्त्यांमध्ये संताप

April 6, 2026
जनता संभ्रमात! भगीरथ भालकेंचे नेमकं चाललंय तरी काय, दोन दिवसात दोन वेगवेगळ्या पक्षाकडून भरले अर्ज; पंढरपूर-मंगळवेढ्याच्या जागेबाबत सस्पेन्स आणखी वाढला?

‘मायबाप जनता’ की सत्तेचा सुगंध? भगीरथ भालकेंच्या ‘पक्षांतराची’ मंगळवेढा-पंढरपुरात मोठी चर्चा

April 5, 2026
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण

मंगळवेढ्यात भाजप महिला मोर्चाचे रणशिंग; तालुका कार्यकारिणी जाहीर; पक्ष बळकटीकरणाचा निर्धार; आशा पाटील यांनी केली निवडीची अधिकृत घोषणा

April 1, 2026
Next Post
शरद पवार आज व्हर्च्युअल रॅलीच्या माध्यमातून मंगळवेढेकरांशी साधणार संवाद

मोठी बातमी! राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज सोलापुरात; असा असणार दौरा

ताज्या बातम्या

जनता संभ्रमात! भगीरथ भालकेंचे नेमकं चाललंय तरी काय, दोन दिवसात दोन वेगवेगळ्या पक्षाकडून भरले अर्ज; पंढरपूर-मंगळवेढ्याच्या जागेबाबत सस्पेन्स आणखी वाढला?

भगीरथदादा आता प्रवास पुरे! ‘पक्षांतराचा प्रवास आता थांबवा’; सिद्धाराम म्हेत्रेंचा भगीरथ भालकेंना रोखठोक सल्ला

April 13, 2026
दुर्दैवी घटना! सांगोल्यातील ‘या’ गावात दोन बहिणींचा शेततळ्यात बुडून मृत्यू

काळीज पिळवटून टाकणारी घटना! शेततळ्यात बुडून बहीण-भावाचा अंत; आजीसमोरच काळाचा घाला; सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना

April 13, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

मंगळवेढेकरांची प्रतीक्षा आता संपणार ! महात्मा बसवेश्वर स्मारकाची जागा निश्चित; निधी कमी पडू देणार नाही; आमदार समाधान आवताडेंची ग्वाही

April 13, 2026
Breaking! मंगळवेढ्याच्या दोन ‘नायब तहसीलदारां’ची तहसीलदार पदावर पदोन्नती

संतापजनक! घरजागा नावावर करण्यास नकार; पोटच्या मुलानेच वृद्ध आईला घराबाहेर हाकलले; न्यायासाठी वृद्धेची पोलिस अधीक्षकांकडे धाव

April 12, 2026
न्यूरोसर्जन डॉ.शिरीष वळसंगकर प्रकरणाला वेगळं वळण; आरोपी महिलेच्या वकिलाचा मोठा खुलासा

बापरे..! सोलापुरातील वकिलास जीएसटीची १२१ कोटी दंडाची नोटीस; काय आहे नेमके प्रकरण?

April 12, 2026
सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गावाची निवड, १० लाख रुपयांचे बक्षीस; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा होणार सन्मान

Breaking! मंगळवेढ्यात शासकीय नियमांची ऐशीतैशी; दालनात वाढदिवस साजरा करणे पडणार महागात; गटविकास अधिकारी यांचा अहवाल सादर करण्याचे पुण्यातून फर्मान

April 12, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा