टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष चंद्रशेखर जयनारायण कोंडुभैरी यांच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त आज रविवार दि.७ जानेवारी रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
आज रविवार दि.७ जानेवारी रोजी सकाळी ९.०० वा. जवाहरलाल शेतकी हायस्कूलमध्ये चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा, हस्ताक्षर स्पर्धा व रांगोळी स्पर्धेचे आयोजन केलेले आहे.
सर्व विजेत्या स्पर्धकास रोख रक्कम, प्रमाणपत्र व ट्रॉफी देण्यात येईल. सदर स्पर्धे चे बक्षिस वितरण शनिवार दि.१३ जानेवारी रोजी सकाळी १०.०० वा. जवाहरलाल हायस्कूलमध्ये विठ्ठल शुगर्सचे चेअरमन अभिजीत पाटील,
रतनचंद शहा सहकारी बँकेचे चेअरमन राहुल शहा, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष प्रथमेश पाटील आदी मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.
यावेळी अरूण किल्लेदार, मुझफ्फर काझी, रामेश्वर मासाळ, मुझम्मील काझी, माणिक गुंगे, संतोष रणदिवे, नागेश राऊत, विशाल खटकळे, अजिंक्य बेंद्रे,
जमीर इनामदार, वैभव ठेंगील, सचिन वडतिले, रविराज मोहिते, आय्याज शेख, सुहास मुरडे, अन्वर मुल्ला आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मंगळवेढा शहर व तालुक्याच्यावतीने सदर कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
आज होणाऱ्या स्पर्धेत सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन चंद्रशेखर कोंडूभैरी मित्र परिवार यांच्या वतीने करण्यात आले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज