मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 71 व्या वर्धापन दिनानिमित्त आज युटोपियन शुगर्स लिमिटेड पंतनगर कचरेवाडी तालुका मंगळवेढा येथे युटोपीयन शुगर्स चे मार्गदर्शक सी. एन देशपांडे साहेब यांचे शुभहस्ते व कारखान्याच चेअरमन उमेशरावजी परिचारक, कार्यकारी संचालक उत्तमराव पाटील आदींच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहन कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी बोलताना सी एन देशपांडे म्हणाले की, युटोपीयन शुगर्स ने विविध क्षेत्रांमध्ये अल्पावधीतच आपल्या कर्तुत्वाने यशाचा झेंडा फडकवला आहे. आज प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने भारतीय तिरंगा ज्याप्रमाणे ताठ मानेने डौलतआहे त्याच प्रमाणे युटोपीयन च्या कार्य कर्तृत्वाचा झेंडा ही असाच फडकत राहावा हीच आशा व्यक्त करतो व प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने मी आपणास शुभेच्छा देतो
यावेळी कार्यकारी संचालक उत्तमराव पाटील म्हणाले की, युटोपीयन शुगर्स हा चालू गळीत हंगामामध्ये आपले अपेक्षित उद्दिष्ट निश्चितपणे पूर्ण करेल नवनवीन तंत्रज्ञान युक्त कारखाना हा अशाच पद्धतीने किंवा त्याहीपेक्षा जास्त प्रगतीने चालवण्याचा आमचा प्रयत्न आहे.काही दिवसातच इतकी प्रगती साधणाऱ्या कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे योगदानही तितकेच महत्त्वाचे असून त्या कर्मचाऱ्यांना भरघोस अशी पगार वाढ लवकरच करणार आहोत.
यावेळी कारखान्याचे चेअरमन उमेश परिचारक म्हणाले की,सोलापूर जिल्ह्यामध्ये सध्या दुष्काळी परिस्थिती असल्याने जिल्ह्यातील काही मोजकेच कारखाने पूर्णक्षमतेने चालवण्यात येत आहेत त्यामध्येच आपला युटोपियन शुगर्स समाविष्ट आहे आज पर्यंत आपल्या कारखान्यावर ऊस उत्पादक यांनी दाखवलेल्या विश्वासाचे प्रतीकच यानिमित्ताने सिद्ध होते आहे. कारखानदारी सध्या अडचणीत आहे भविष्यामध्ये कारखानदारीला अधिकचे उत्पन्न मिळण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहावे लागणार आहे युटोपियन याकामी मागे राहणार नसल्याचे त्यांनी सांगितले यावेळी कारखान्याचे मुख्य शेती अधिकारी धनंजय व्यवहारे यांनीही उपस्थितांना प्रजासत्ताक दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लक्ष्मण पांढरे यांनी केले
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज